पुसेसावळी विकास सेवा सोसायटीचे नवे नेतृत्व; शहाजी पाटील चेअरमन, शोभा कदम व्हा.चेअरमन बिनविरोध

पुसेसावळी : पुसेसावळी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हा.चेअरमन पदांसाठी झालेल्या निवडणुकीत मा. शहाजी पाटील यांची चेअरमनपदी तर सौ. शोभा कदम यांची व्हा.चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली. सोसायटीच्या संचालकांनी एकमुखी पाठिंबा दर्शवत दोन्ही पदांवर विरोध नसल्याने ही निवड सहज झाली.

        या निवडीमुळे सोसायटीच्या कार्यात एकजूट आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. शहाजी पाटील यांनी २००६ पासून तीन वेळा उच्चांकी मताधिक्य तर एक वेळा बिनविरोध असे सलग २० वर्षे संचालक पदावर वंजारवाडी येथून आपली पकड मजबूत ठेवली आहे. त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली सोसायटीच्या विकासाच्या कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. तर उपाध्यक्षपदी शोभा कदम यांच्या निवडीमुळे महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यात नवीन दृष्टिकोन येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

             सोसायटीच्या विकासाच्या विविध योजना, सदस्य हितसंबंध आणि गावाच्या प्रगतीसाठी या नव्या नेतृत्वाकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे. बिनविरोध निवड झाल्याने सोसायटीच्या कार्यात राजकीय वादविवाद न राहता केवळ विकासावर लक्ष केंद्रित करता येईल, असे मत अनेक सभासदांनी मांडले.

या निवडीबद्दल विकास सेवा सोसायटी चे सभासद असलेल्या पुसेसावळी, थोरवेवाडी, वंजारवाडी (लक्ष्मीनगर) आणि मांडवे शिवारच्या शेतकरी बांधव आणि नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा केल्याचे दिसून आले.त्यासोबतच सभासद आणि संचालकांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त चेअरमन, व्हा.चेअरमन यांचा सत्कार करून शुभेच्छा देत सोसायटीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

    निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मा.सहायक निबंधक, सहकारी संस्था,अतुल यलमर यांनी काम पाहिले. यावेळी मा. सरपंच सुर्यकांत शंकरराव कदम (सुरेश बापू), मा. चेअरमन रविंद्र यशवंत कदम, मा.सरपंच अशोक काकासो कदम, मा. व्हाईस चेअरमन सुशांत सदुकर गुरव, दत्तात्रय भरत कदम, सचिव संदिप सपकाळ यांच्यासह संचालक, सभासद, शेतकरी, कर्मचारी वृंद यांचे सोबतच वंजारवाडी येथील युवक आणि जेष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.


जिल्हा बॅंकेच्या मतदानाचा ठराव सुर्यकांत शंकरराव कदम (सुरेश बापू) यांच्या नावे.

     आजपर्यंत च्या पुसेसावळी विकास सेवा सोसायटीच्या इतिहासात "जिल्हा बॅंकेच्या मतदानाचा ठराव कोणाच्या नावाने करायचा?" हा प्रश्न कधीच निर्माण झाला नव्हता. न विचारता दिवंगत नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्या नावेच ठराव संचालकांच्या स्वेच्छेने होत होता. परंतू त्यांच्या निधनाने पहिल्यांदाच ठराव दुसऱ्याच्या नावाने करताना संचालक भावूक झाल्याचे दिसून आले. सुरेश बापूंच्या नावाने ठराव केल्यानंतर नवनियुक्त चेअरमन शहाजी पाटील यांच्यासह सर्वच उपस्थितांनी चंद्रकांतदादा पाटील यांना आदरांजली वाहिली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला