टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद

३२ लाखांच्या २ वाहनांसह सोलापूरच्या आरोपीस सातारा पोलिसांकडून अटक

​सातारा : नवीन महिंद्रा थार कार खरेदी करण्याचा बहाणा करून टेस्ट ड्राईव्हच्या नावाखाली गाडी पळवून नेणाऱ्या अट्टल भामट्याला सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने सोलापूर येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. सोहेल अफजल बागवान (वय २८, व्यवसाय- मजुरी, मूळ रा. जुनी पेठ, पंढरपूर; सध्या रा. जामखंडी पूल, बुधवार पेठ, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून तब्बल ३२ लाख रुपये किमतीच्या दोन महिंद्रा थार गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या धडक कारवाईमुळे सातारा शहर आणि पिंपरी-चिंचवड हद्दीतील चाकण पोलीस ठाण्यातील दोन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

   ​दिनांक ५ जुलै २०२६ रोजी सातारा शहरातील महिंद्रा शोरूममधून एका अनोळखी इसमाने थार गाडी खरेदी करायची असल्याचे भासवून टेस्ट ड्राईव्हसाठी गाडी ताब्यात घेतली होती. मात्र गाडी पुन्हा परत न आणता तो पसार झाला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाचे आदेश दिले होते.

    डी.बी. पथकाने तात्काळ घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले असता आरोपी गाडी घेऊन पुण्याच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. त्यानंतर गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे पोलिसांनी सोलापूर शहरातून संशयित आरोपी सोहेल बागवान याला ताब्यात घेतले.

 अटकेदरम्यान पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने सातारा शहरासह चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही अशाच प्रकारे फिर्यादीचा विश्वास संपादन करून ३२ लाख रुपये किमतीची दुसरी थार गाडी पळवल्याची कबुली दिली. आरोपीने दाखवून दिलेल्या ठिकाणांवरून पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केली आहेत.

​दरम्यान, वाहन खरेदी-विक्री अथवा टेस्ट ड्राईव्ह देताना नागरिक आणि व्यावसायिकांनी आवश्यक कागदपत्रांची खातरजमा करावी तसेच कोणत्याही संशयास्पद व्यवहाराची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन सातारा शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

    ​ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रवीण कडव यांच्यासह डी.बी. पथकातील अंमलदार पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, वैभव माने, मच्छिंद्रनाथ माने, सुहास कदम, सुशांत कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, सचिन आदमाने, ऋषिकेश डोळस आणि सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला