खळ उठळ आहे वस्ती उठवायला वेळ लागणार नाही.. आ. महेश शिंदे
आजू मुल्ला
- Tue 26th Jul 2022 06:47 am
- बातमी शेयर करा
कोरेगाव : आम्ही छोटासा चिमटा घेतला. तर, अख्ख राज्य बदलून टाकलयं, हे तर किरकोळ आहे. आमच्या नादाला लागला तर तुमचा नक्की कार्यक्रम करू. आमच्यासोबत मुख्यमंत्री दाढीपण आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपण आहेत. आता ठाण्याची दाढी आहे, ते टायमिंग आले की कार्यक्रम करतातच, अशा शब्दात आजू मुल्ला यांनी विरोधकांना इशारा दिला. दरम्यान, एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात संधी देतील, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.
कोरेगाव शहरातील विविध विकासकामांचे उदघाटन आणि लोकार्पण आ. महेश यांच्या हस्ते करण्यात झाले. यावेळी ते बोलत होते. आ. महेश शिंदे म्हणाले, कोरेगाव मतदार संघ बदलला आहे. येथील आमदार आता महेश शिंदे आहे. यापुढं गुंडगिरी दहशत सहन केली जाणार नाही. आमच्या कामाची पद्धत वेगळी आहे. आम्ही छोटासा चिमटा घेतला. तर अख्ख राज्य बदलून टाकलय हे तर किरकोळ आहे. आमच्या नादाला लागाल तर कार्यक्रम करू. आमच्या सोबत मुख्यमंत्री दाढीपण आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपण आहेत.
कोरेगावच्या विकासासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणे गरजेचे आहे. तालुक्यातील जनतेसाठी महत्वकांक्षी प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. त्यासाठी मॉफकोमधील 4 एकर जागा आमच्या ताब्यात येत आहे. मागच्या सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांनी जिरवण्याच्या नादात ती जागा जाणीवपूर्वक मिळून दिली नसल्याचे सांगत आ. महेश शिंदेंनी आ. अजित पवारांना टोला लागवला.
राष्ट्रवादीला विचारधारा काय आहे? याच उचल त्याचं उचल. कारखाना, सूतगिरणी खाऊन भ्रष्टाचार करणे असले राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा विसर हा राष्ट्रवादीच्या नेत्यांना पडला आहे. त्यामुळे त्यांना आता पक्ष टिकवणे अवघड झाले आहे म्हणूनच रोहित पवार निवडणुका लागतील विधान करत आहेत, अशी टीकाही त्यांनी राष्ट्रवादीवर केली आहे.
आ. शशिकांत शिंदे हे भाजपच्या वाटेवर आहेत. यावर बोलताना आ. महेश शिंदे म्हणाले, तसे झाल्यास त्यांना मिठीत घेऊन स्वागत करू. इतक्या दिवसांनी त्यांचे नेते चुकीचे होते याची त्यांना उपरती झाली. ते ज्या नेतृत्वाखाली काम करत होते ते चुकीचे करत होते. या मतदारसंघाला लुटत होते हे त्यांना पटलं असेल, असा टोलाही त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, आमचे नेते एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात संधी देतील. शिवसेनेचे 80 टक्केजिल्हा प्रमुख हे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहेत. काही ठराविक जणांना पक्षात घेणार असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले आहे.
MaheshShinde
shashikantshinde
स्थानिक बातम्या
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Tue 26th Jul 2022 06:47 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Tue 26th Jul 2022 06:47 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Tue 26th Jul 2022 06:47 am
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Tue 26th Jul 2022 06:47 am
यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश
- Tue 26th Jul 2022 06:47 am
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Tue 26th Jul 2022 06:47 am
संबंधित बातम्या
-
नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी उघड केला नगर परिषदेतील कर घोटाळा, अनेक वर्षापासून सुरू होता कर घोटाळा
- Tue 26th Jul 2022 06:47 am
-
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Tue 26th Jul 2022 06:47 am
-
कसं काय पाटील बर हाय का विधानसभेत जे ऐकले ते खर आहे का? ॲड. संदीप कांबळे.
- Tue 26th Jul 2022 06:47 am
-
महाबळेश्वरच्या विकासस्वप्नाला अखेर हिरवा कंदील!
- Tue 26th Jul 2022 06:47 am
-
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत - रणजितसिंह भोसले
- Tue 26th Jul 2022 06:47 am












