नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
काय रिअल आणि काय रील?डॉ महेश ना. बलान्से
- Mon 6th Jul 2026 08:07 pm
- बातमी शेयर करा
चला तर एक मंथन करूयात आपण आपल्या स्वतः वरती.
रिअल काय आणि काय नो रिअल!
आपण जे आहोत तेच नो रिअल आहे कसे तर, सोशल मीडिया वर दिसणारे आपण नो रिअल आहोत. कित्येक फिल्टर लावून आपण आपला डीपी सजवितो, कधी आई वडिलांची किंवा वडील धाऱ्यांची मदत नं करणारे आपण ज्ञान देणारे रील शेर करतो, बडेजावं करणारे स्टेटस ठेवतो, सोशल मीडिया वर देश प्रेम, भाषा प्रेम दाखविणारे आपण स्वतःच्याच मातृभाषेला दुय्यम दर्जाची वागणूक देतो. चार चौघात बोलताना मध्ये मध्ये इंग्लिश भाषेच्या वापरण्याला स्टेट्स समजणारा आपला समाज मराठी किंवा मातृभाषा बोलणाऱ्याला मागास समजतो, आपले सर्वोत्तम सात्विक अन्न त्यागून मांसाहारी, पश्चात्य पिझ्झा, बर्गर, आणि चायनीज खाण्याला स्टॅंडर्ड समजतो, कधी उसाचा रस न पिणारा कोका कोला ठम्स अप सारखे विषारी पेय ढोस ढोस ढोसतो,
वारी, भजन यांना लाजणारा डीजे च्या तालावर बेधुंध नाचतो.
नद्यांना नाल्याचे स्वरूप देणारे आपण स्विमिंग पूल मध्ये पोहायला पैसे मोजतो एवढंच नव्हे तर पारंपरिक वेशभूषेला नाव ठेवून अंग प्रदर्शन करणारे तोडके कपडे घालण्याला फॅशन मानतो, काय रें हि आपली प्रगती? हि प्रगती नव्हे तर अधोगती आहे. माणसात माणुसकी आणि आपलेपणा महत्वाचा असतो, आपल्या संस्कृतीची जाण आणि अभिमान महत्वाचा असतो.
आपले पूर्वज काही मूर्ख नव्हते, त्यांनी अखंड परिश्रम व संघर्ष केलाय हे सर्व जपायला. या देशाने अनेक फाळण्या बघितल्या, अनेक युद्ध बघितले, परतंत्र्य भोगले,मुघल, इंग्रज, पोर्तुगीज यांच्याशी संघर्ष केला तरीही आज आपली संस्कृती कायम आहे पण ती कुणामुळे?
महाराणा प्रताप, झाशीची राणी, आईसाहेब जिजाऊ, राजे श्री शिव छत्रपती, धर्मवीर छत्रपती संभाजी राजे, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद इत्यादी महापुरुषांमुळे!
यांनी जपलीय आपली संस्कृती, आपले पणा, आपली अस्मिता आणि आपण काय करतोय?
नुसते मोबाईल च्या जगात डिंग्या हाकतोय. यांच्या हाती जर मोबाईल असते आणि त्यांची मानसिकता आपल्या सारखीच असती तर आज आपण भीक मागायच्या देखील लायकीच राहिलो नसतो.
अंगावर कपडे नसते, खायला अन्न आणि राहायला छत्र नसते.
आज या आभासी दुनियेतून बाहेर येण्याची गरज आहे. आपली माय, माती, अस्मिता वाचावायला पाहिजे. दुनियेला दाखवायला नाही तर माणुसकीचे ऋण फेडायला जगलो पाहिजे, भूतदया जपली पाहिजे. प्राणीमात्रावर प्रेम केले पाहिजे. दान करून पैसा शुद्ध केला पाहिजे. गोर गरिबांची, अधू -अपंग, व रुग्णांची सेवा केली पाहिजे. खरा देव यातच आहे. सेवेतच आहे.
- मातृभाषेला जपलं पाहिजे. माज पैश्यात नव्हे तर माणुसकीचा असायला पाहिजे.
- संकट काळी मोबाईल मध्ये विडिओ काढत न बसता मोठ्या मनाने व धाडसाने मदत केली पाहिजे.
आपल्या देशाची धरोहर जपली पाहिजे. गड किल्ल्याचे संरक्षण केले पाहिजे. थोर मोठ्यांचे आदर्श पाळायला हवेत. एकत्र कुटुंब पद्धती जपायला पाहिजे. भ्रष्टाचार रोखला पाहिजे यातच देश हित समावले आहे. हाच खरा विकास व आपली भागीदारी आहे. आई वडिलांचे कष्ट व मेहनत समजून घेऊन आपल्या परिवाराचा परिणामी देशाचा विकास करण्यास हातभार लावणे हेच आपले परम कर्तव्य आहे.
तरी आपण रिअल राहायला पाहिजे कारण या मुळे त्रास कमी होतो, जे आहोत, जसे आहोत तसेच सर्वांसमोर प्रकट व्हायला हवे, बडे जाव, खोट्या बाता, मोठं मोठ्या परिणामी खोट्या गोष्टी समाजाला दाखविण्यापेक्षा 'बोलें तैसा चाले त्याची वंदावे पाऊले' म्हणत जगायला शिकल पाहिजे. आज कितीही आपण पुढे गेलो तरी मायेची ममता, प्रेम, विश्वास विकत घेऊ शकत नाही म्हणून जगात आजही याच गोष्टी मौल्यवान आहेत आणि किती जग पुढे गेलं तरी भावनांची व प्रेमाची आणि ममतेची जागा AI घेऊ शकणार नाही म्हणून रिअल रहा आणि जगण्याचा मनसोक्त आनंद घ्या.
धन्यवाद!
डॉ महेश ना. बलान्से
९०९६९७७६३६
स्थानिक बातम्या
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Mon 6th Jul 2026 08:07 pm
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Mon 6th Jul 2026 08:07 pm
शिंदे साहेब, जावळी-महाबळेश्वरची हाक ऐका!
- Mon 6th Jul 2026 08:07 pm
“सात संचालक ‘ताब्यात’… तरी ठराव धुळीस! हुमगावात मानकुमरेंचा हल्लाबोल
- Mon 6th Jul 2026 08:07 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Mon 6th Jul 2026 08:07 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Mon 6th Jul 2026 08:07 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Mon 6th Jul 2026 08:07 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Mon 6th Jul 2026 08:07 pm
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Mon 6th Jul 2026 08:07 pm











