यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश

सातारा : शिक्षण प्रसारक संस्था संचलित, न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, करंजे पेठ, साताराच्या चि.रियांश देशमुखने इ. ५ वी स्कॉलरशिप परीक्षा आणि सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर व शाळेतील शिष्यवृत्तीच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे तसेच संस्थेचे सचिव मा. श्री. तुषार पाटील सर यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे घवघवीत यश संपादन केले आहे.

     नुकत्याच जाहीर झालेल्या स्कॉलरशिप परीक्षेच्या निकालात रियांशने तालुका पातळीवर १५ वा  आणि जिल्हा पातळीवर ९१ वा  क्रमांक पटकावून तालुक्याचा व जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.

       केवळ स्कॉलरशिपच नव्हे, तर अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या 'अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत' (AISSEE) देखील रियांशने उत्तम गुण मिळवून सैनिक स्कूल, चंद्रपूर येथे आपला प्रवेश निश्चित केला आहे. देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या रियांशच्या आयुष्यातील हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याचे व त्याच्या पालकांचे कौतुक होत असून, त्याच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी आणि लष्करी शिक्षणाच्या प्रवासासाठी संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ.वत्सला डुबल, उपाध्यक्ष मा. श्री.जगन्नाथ किर्दत,मा. श्री. नंदकिशोर जगताप, सचिव मा.श्री. तुषार पाटील, स्कूल कमिटी चेअर पर्सन मा. सौ. प्रतिभा चव्हाण, संचालक मा. सौ. हेमकांची यादव तसेच सर्व माननीय संचालक व सदस्य, शिष्यवृत्ती मार्गदर्शक ,सर्व शिक्षक, सर्व पालक,सर्व करंजे ग्रामस्थ यांच्याकडून मनःपूर्वक  हार्दिक शुभेच्छा!

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला