महाबळेश्वर बदनामीचा कट? ‘नवीन महाबळेश्वर’ला चमकवण्यासाठी जुन्या शहराला लक्ष्य केल्याचा नगराध्यक्षांचा गंभीर आरोप!
Satara News Team
- Wed 17th Jun 2026 12:20 pm
- बातमी शेयर करा
महाबळेश्वर :महाबळेश्वरच्या पर्यटन व्यवसायाला आणि शहराच्या प्रतिमेला जाणीवपूर्वक धक्का देण्याचा एक मोठा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी केला आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून किरकोळ घटनांना अतिरंजित स्वरूप देत संपूर्ण महाबळेश्वरची बदनामी केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणामागील छुप्या शक्तींचा शोध घेण्याची मागणी केली आहे.
नगराध्यक्ष शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला की, महाबळेश्वरमध्ये वाहतूक, पार्किंग, टोल किंवा पर्यटकांशी संबंधित किरकोळ समस्या यापूर्वीही होत्या आणि सोशल मीडिया देखील अस्तित्वात होता. मग गेल्या एक-दोन वर्षांत अचानक महाबळेश्वरविरोधी नकारात्मक प्रचाराचे प्रमाण एवढे वाढले कसे? यामागे नेमका कोणाचा अजेंडा काम करत आहे, याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी त्यांनी अत्यंत खोचक सवाल उपस्थित करत, “जुन्या महाबळेश्वरची प्रतिमा मलिन करून ‘नवीन महाबळेश्वर’ प्रकल्पाला लोकप्रिय करण्याचा प्रयत्न सुरू आहे का?” असा प्रश्न विचारला. आधीच महाबळेश्वर आणि क्षेत्र महाबळेश्वर अशी दोन स्वतंत्र ओळख असताना तिसऱ्या प्रकल्पाला पुन्हा ‘नवीन महाबळेश्वर’ हे नाव देण्यामागचा हेतू काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महाबळेश्वर शहरातील अनेक मूलभूत समस्या आजही कायम असताना, रस्ते, पार्किंग, पाणीपुरवठा आणि पर्यटन सुविधांसाठी निधीची गरज असताना कोट्यवधी रुपयांचा निधी नवीन प्रकल्पाकडे वळवला जात असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “जुन्या महाबळेश्वरच्या विकासाकडे दुर्लक्ष करून नवीन प्रकल्पाला प्राधान्य का दिले जात आहे?” असा थेट सवाल त्यांनी शासन आणि संबंधित यंत्रणांना केला.
दरम्यान, काही पर्यटकांशी झालेल्या किरकोळ वादांच्या घटना, टोलनाक्यांवरील तक्रारी किंवा स्थानिक प्रश्नांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल करून ‘बॉयकॉट महाबळेश्वर’ सारखे ट्रेंड निर्माण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. काही व्यक्ती किंवा गट संपूर्ण शहराची प्रतिमा खराब करण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने नकारात्मक वातावरण निर्माण करत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली.
नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी महाबळेश्वरकर, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. “महाबळेश्वर हे केवळ पर्यटनस्थळ नाही, तर हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. शहराची बदनामी करणाऱ्या कोणत्याही कटाविरुद्ध एकजुटीने उभे राहणे ही काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले.
खोचक सवाल
• महाबळेश्वर बदनाम करून ‘नवीन महाबळेश्वर’ला चमकवण्याचा डाव कोणाचा?
• सोशल मीडियावर सतत व्हायरल होणाऱ्या नकारात्मक मोहिमांचा सूत्रधार कोण?
• जुन्या महाबळेश्वरच्या विकासाला डावलून नवीन प्रकल्पांना प्राधान्य का?
• पर्यटन राजधानीची प्रतिमा मलिन करण्यामागे आर्थिक आणि राजकीय स्वार्थ दडले आहेत का?
• महाबळेश्वरचे नाव वापरून नवीन ब्रँड उभा करण्यासाठी जुन्या शहराची प्रतिमा जाणीवपूर्वक खराब केली जात आहे का?
स्थानिक बातम्या
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Wed 17th Jun 2026 12:20 pm
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Wed 17th Jun 2026 12:20 pm
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Wed 17th Jun 2026 12:20 pm
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Wed 17th Jun 2026 12:20 pm
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Wed 17th Jun 2026 12:20 pm
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Wed 17th Jun 2026 12:20 pm
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Wed 17th Jun 2026 12:20 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Wed 17th Jun 2026 12:20 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Wed 17th Jun 2026 12:20 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Wed 17th Jun 2026 12:20 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Wed 17th Jun 2026 12:20 pm
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Wed 17th Jun 2026 12:20 pm
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Wed 17th Jun 2026 12:20 pm













