संघर्ष आम्हाला नवीन नाही आणि संघर्षाला मी घाबरत नाही... मनोज दादा घोरपडे.
सतिश जाधव- Sun 18th Sep 2022 09:30 am
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : रहिमतपूर येथे मा पंतप्रधान नरेंद्र मोदी व विकम पावस्कर यांच्या वाढदिवसानिमीत्त राष्ट्रपिता ते राष्ट्रनेता कार्यक्रम अंतर्गत सेवा साप्ताह आयोजित केला होता. यावेळी रक्तदान शिबीर व अग्निवीर सैनिक यांचा सत्कार कार्यक्रम जगममठ येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलतांना मा मनोनदादा म्हणाले येणाऱ्या कालावधीत मला व माझ्या कार्यकर्त्यांना अडचणीत आणणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा भाजप नेते मनोज दादा घोरपडे यांनी दिला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी रहिमतपूर चे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने हे होते. रहिमतपूर येथील मनोज दादा युवा मंचच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले येथील गांधी चौकात जेसीपी मधून पुष्पवर्षाव करीत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली वीरशैव्य जंगम समाज मठ येथील झालेल्या कार्यक्रमात त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य संजय घोरपडे, अण्णासाहेब , भाजप तालुकाध्यक्ष महेश जाधव, माजी नगरसेवक शेखर माने ,विकास गायकवाड , रुक्मिणी जाधव , उत्कर्ष माने, रणजीत माने , लिंबाजी सावंत आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले मागच्या काही कालावधीत मी खूप सोसले तसेच माझ्या कार्यकर्त्यांनाही नाहक त्रास झाला आहे सत्तेचा व पालकमंत्री पदाचा वापर करून अनेकांना अडचणीत आणले गेले आहे परंतु इथून पुढे काळात जशास तसे उत्तर दिले जाईल
वासुदेव माने म्हणाले रहिमतपूर पंचक्रोशीत आजपर्यंत अनेकांनी कार्यकर्त्यांना अंधारात ठेवून काम केले. परंतु इथुन पुढे भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून मनोज दादांच्या नेतृत्वात रहिमतपूर नगरपालिकेवर भगवा फडकवणारच त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे. महेश बाबा जाधव म्हणाले येणारी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत भाजपा वीजयी करून २०२४ ला आमदारकीची माळ मनोज दादाच्या गळ्यात घालण्याचे अवहान केले .
प्रास्ताविक रंजीत माने व आभार उत्कर्ष माने यांनी मानले यावेळी मा. दत्ता जाधव, पै. तुषार चव्हाण, रुक्मीणी जाधव, सतिश लावंघरे, पै. सोमनाथ भोसले, सतिश काका, संजय घाडगे, अदि रहिमतपूर सह परिसरातील भाजपचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी झालेल्या कार्यक्रमात मनोज दादा घोरपडे यांनी माजी पालकमंत्री कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांचे नाव न घेता टीका केली कराड उत्तर मतदारसंघाचे आणि जिल्ह्याचे दुर्दैव म्हणूनच यांना पालकमंत्री पद मिळाले पालकमंत्री पदाचा उपयोग जिल्ह्याच्या विकासासाठी करायचा असतो परंतु यांना मिळालेल्या मंत्रिपदाचा व पालकमंत्री पदाचा उपयोग कराड उतर मधील विरोधातील कार्यकर्त्यांना संपवण्यासाठीच केला त्यांच्या गुणामुळेच त्यांना अडीच वर्षात पायउतार व्हावे लागले अशी खरमरीत टीका घोरपडे यांनी केली
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sun 18th Sep 2022 09:30 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sun 18th Sep 2022 09:30 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sun 18th Sep 2022 09:30 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sun 18th Sep 2022 09:30 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sun 18th Sep 2022 09:30 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sun 18th Sep 2022 09:30 am
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Sun 18th Sep 2022 09:30 am
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sun 18th Sep 2022 09:30 am
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Sun 18th Sep 2022 09:30 am
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Sun 18th Sep 2022 09:30 am
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Sun 18th Sep 2022 09:30 am
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Sun 18th Sep 2022 09:30 am
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Sun 18th Sep 2022 09:30 am












