... आणि 'किसन वीर' चा काटा झाला लॉक पट्ट्याने आणला तब्बल निव्वळ ऊस ४७.४५१ मेट्रिक टन
बापू वाघ- Thu 2nd Feb 2023 03:51 pm
- बातमी शेयर करा
वाई : किसन वीर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पाच तालुक्यातील शेतकरी सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्याचे जननायक आमदार व किसन वीर कारखान्याचे चेअरमन मकरंद आबा पाटील यांनी किसन वीर व खंडाळा कारखान्यांचा गाळप हंगाम मोठ्या उत्साहात सुरू केला. किसन वीर व खंडाळा कारखाना सुरू झाल्याने शेतकरी वर्गही सुखावला आहे. कारखान्यामध्ये ऊसः वाहतुक करणाऱ्या वाहनांचे वजन साधारणतः २२ ते २५ मेट्रिक टनापर्यंत असते. परंतु आज (शुक्रवार) अक्षय कृष्णदेव पवार या ट्रॅक्टर मालकाने ४७.४५१ मेट्रिक टन निव्वळ ऊस आणल्याने किसन वीर कारखान्याचा काटा लॉक झाला. या वाहन मालकाने केलेल्या कामाचे श्रेय त्याला देऊन केलेल्या कामाची पोहोच पावती देणे आवश्यक असल्याने कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी अक्षय पवार व वाहन चालक संदिप दिलीप साबळे यांचा शॉल, श्रीफळ, पेढे देऊन यथोचित सत्कार केला.
.किसन वीर व खंडाळा कारखाना आर्थिक गर्तेत सापडल्याने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासद हतबळ झालेला दिसून येत होता. पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेला कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर असतानाच मे २०२२ मध्ये कारखान्याच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कारखान्याची सुत्रे वाई-खंडाळा- महाबळेश्वर तालुक्याचे जननायक आमदार मकरंद आबा पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील यांच्याकडे आली. त्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकरी सुखावला गेला व कारखाना पुन्हा जोमाने सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. शेतकऱ्यांनी टाकलेल्या विश्वासावर किसन वीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने वेळेत सुरू करून ऊस उत्पादकांच्या खात्यावर पहिला अॅडव्हान्स जमाही झाला. त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येऊ लागला. कारखान्याचे गाळपही व्यवस्थितपणे सुरू आहे. शुक्रवार (दि. २) रोजी सुरज रामदास येवले पांडेवाडी, ता. वाई या शेतकऱ्याच्या शेतातील ऊस अक्षय कृष्णदेव पवार यांच्या वाहनातून आणण्यात आला. या वाहनाचे भर वजन ५६.१८० मेट्रिक टन असून निव्वळ ऊसाचे वजन ४७.४५१ मेट्रिक टन भरल्याने काट्यावर वजनच करता आले नाही व काटा लॉक झाला. किसन वीर कारखान्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहन भरून आल्याने या वाहन मालकाचा सत्कार कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी केला. प्रमोद शिंदे यांनी वाहन मालक अक्षय पवार व वाहन चालक संदिप साबळे यांचा सत्कार करून त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करीत सर्व वाहन मालकांनी कारखान्याप्रती अशाचप्रकारे प्रेम, निष्ठा बाळगावी व ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांनीही आपला संपूर्ण ऊस किसन वीर कारखान्यालाच घालावा असेही आवाहन व्यवस्थापनाच्यावतीने केले.
अक्षय पवार यांच्या सत्कारप्रसंगी कारखान्याचे संचालक प्रकाश धुरगुडे, मुख्य शेती अधिकारी विठ्ठलराव कदम, खंडाळा कारखाना शेती अधिकारी अशोक घाडगे, केनयार्ड सुपरवायझर हणमंत निकम, अरविंद नवले, संदीपशेठ बाबर, अजय भोसले, विजय शिंगटे, सुजितसिंह जाधवराव, सचिन निकम, मामा पाटील, गिरीश कडाळे, ज्ञानेश्वर महामुनी आदी उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Thu 2nd Feb 2023 03:51 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Thu 2nd Feb 2023 03:51 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Thu 2nd Feb 2023 03:51 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Thu 2nd Feb 2023 03:51 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Thu 2nd Feb 2023 03:51 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 2nd Feb 2023 03:51 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 2nd Feb 2023 03:51 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 2nd Feb 2023 03:51 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 2nd Feb 2023 03:51 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 2nd Feb 2023 03:51 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 2nd Feb 2023 03:51 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 2nd Feb 2023 03:51 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 2nd Feb 2023 03:51 pm













