उंब्रजजवळ वेगाने निघालेल्या एसटीबसचा टायर फुटला 70 प्रवासी बचावले
Satara News Team
- Tue 30th May 2023 12:00 pm
- बातमी शेयर करा
उंब्रज: पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर शिवडे (ता. कराड) गावच्या हद्दीत भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसचा पुढील टायर फुटला. दरम्यान चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. बसमधील सुमारे 70 प्रवासी बचावले आहेत. सोमवारी सकाळी ही घटना घडली. घटनेनंतर प्रवाशांचा सुमारे तासभर खोळंबा झाला. अन्य एसटीच्या प्रतीक्षेत भर उन्हात प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले.याबाबत अधिक माहिती शी, पुणे-बंगलोर महामार्गावर शिवडे गावचे हद्दीत मसुर फाटा येथे अंडरपास पुलाचे काम पूर्णत्वास आले असून पुलावरून मेढा- सातारा ते नरसिंहवाडी अशी प्रवासी घेऊन एसटी बस निघाली होती. एसटीत सुमारे 70 प्रवासी प्रवास करत होते. पुलाच्या उतारावर अचानक या बसचा पुढील क्लिनर बाजूचा टायर फुटला. त्यामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून बस नियंत्रितपणे रस्त्याकडेला आणून उभी केली.महामार्गावर नेहमीच वाहनांचा वेग मोठा व संख्या मोठी असते. अशावेळी पूलावरून उताराला टायर फुटल्याने बसच्या चालकां प्रसंगावधान दाखवत बस बाजूला घेतली. चालकांमुळे सर्व प्रवाशी सुखरूप बचावले तसेच त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. दरम्यान या घटनेनंतर बसमधील विद्यार्थी व इतर प्रवासांचा खोळंबा झाला
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Tue 30th May 2023 12:00 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Tue 30th May 2023 12:00 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Tue 30th May 2023 12:00 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Tue 30th May 2023 12:00 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Tue 30th May 2023 12:00 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 30th May 2023 12:00 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 30th May 2023 12:00 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 30th May 2023 12:00 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 30th May 2023 12:00 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 30th May 2023 12:00 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 30th May 2023 12:00 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 30th May 2023 12:00 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 30th May 2023 12:00 pm













