श्री.चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटी रहिमतपूरच्या शाखांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न

रहिमतपूर : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून रहिमतपूर येथील श्री. चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुमन परशराम फडतरे प्राथमिक , माध्यमिक व गुरुकुल अकॅडमी या शाखांच्या वतीने योग्य प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. 
     योग प्रत्यक्षिके व मार्गदर्शन करण्यासाठी योग प्रशिक्षक श्री. दत्तात्रय चव्हाण सर , श्री. नवनाथ चव्हाण सर  व श्री. पांडुरंग कोळी सर उपस्थित होते. 
मुख्याध्यापक श्री. दादासाहेब जगताप यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शारीरिक , मानसिक व भावनिक संतुलनासाठी योग उपयुक्त ठरतो .योगामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढून आजारांपासून व्यक्तींचे संरक्षण होते. तसेच आरोग्यदायी जीवनशैलीसाठी साठी योग अत्यंत उपयुक्त असून फक्त एक दिवस योग दिन साजरा न करता दररोज  सर्व विद्यार्थी , शिक्षक व पालकांनी सुद्धा योगासने केली पाहिजेत असे त्यांनी सांगितले.
                 योग प्रशिक्षकांचे मुख्याध्यापकांच्या हस्ते गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
      योग प्रत्यक्षिकांमध्ये श्री. चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीच्या तिन्ही शाखांमधील सर्व विद्यार्थी ,मुख्याध्यापक , शिक्षक - शिक्षकेत्तर सेवक सहभागी झाले होते.
योग दिनानिमित्त सौ.कल्पना जाधव यांनी सूत्रसंचालन केले . तर आभार श्री. बाजीराव कारंडे यांनी मानले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला