खातगुणचे सुपुत्र संजय काळुखे याने केली दक्षिण आफ्रिकेतील अवघड कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा पार
खटाव तालुक्यासह सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात खोवला मानाचा तुराSatara News Team
- Fri 16th Jun 2023 04:41 pm
- बातमी शेयर करा
पुसेगाव : जगातील सर्वात जुनी व अत्यंत अवघड समजली जाणारी मॅरेथॉन म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन धावपटूच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची पाहणारी ही मॅरेथॉन खातगुण येथील संजय काळुंखे यांनी पूर्ण करत खात गुण तसेच खटाव तालुका व सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
खातगुण तालुका खटाव येथील रहिवासी असलेले येथील वेदावती हायस्कूल मधील शिक्षण घेऊन व्यवसायासाठी कल्याण येथे सध्या रहिवासी असलेले, खातगुण सोसायटीचे चेअरमन विजय लावंड यांचे जिवलग मित्र संजय साळुंखे यांनी जगातील अत्यंत अवघड मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी आणि ती यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून सराव करीत होते. सुप्रसिद्ध धावपटू आणि प्रशिक्षक सतीश गुजरात यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेली मेहनत फळाला आली. आतापर्यंत आपण आपल्याकडील मुंबई मॅरेथॉन, ठाणे मॅरेथॉन, पुणे मॅरेथॉन अशा स्पर्धा बघितले आहेत. मात्र दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन त्यांची तुलना केली तर आपल्याकडील या सर्व मॅरेथॉन म्हणजे अक्षरशः लहान मुलांचा खेळ वाटेल यावरूनच कॉम्रेड मॅरेथॉन मधील आव्हानाचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो, यात सहभागी होणाऱ्या धावपटूंनी 42 किलोमीटर अंतराची मॅरेथॉन चार तास आणि 50 मिनिटांच्या आत मध्ये पूर्ण केली असेल तरच त्यांना या कॉम्रेड मॅरेथॉन मध्ये प्रवेश दिला जातो.
कॉम्रेड मॅरेथॉन अंतर तब्बल 90 किलोमीटर अंतर होते म्हणजे आपल्याकडील मॅरेथॉनच्या दुपटी हून अधिक म्हणजे ९० किलोमीटरचे अंतर पार करावे लागते तेही 12 तासाच्या आत मध्ये आणि कुठेही न थांबता तरच 21 किलोमीटर 42 km आणि 65 किमीच्या अंतर हे आयोजकांनी ठरवून दिलेल्या वेळेच्याच पार करण्याचे बंधन धावपटूवर असते. एक प्रकारे ही मॅरेथॉन म्हणजे धावपटूंच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची परीक्षा पाहणारी असते, इतकी कठीण प्रायम मॅरेथॉन पूर्ण केल्याबद्दल संजय काळोखे,यांचे खातगुण सोसायटीचे चेअरमन विजय लावंड, सरपंच अमीना सय्यद, उपसरपंच शिवाजी लावंड ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सोसायटीचे सर्व सभासद तसेच परिसरातील विविध मान्यवरांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 16th Jun 2023 04:41 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 16th Jun 2023 04:41 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 16th Jun 2023 04:41 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 16th Jun 2023 04:41 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 16th Jun 2023 04:41 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 16th Jun 2023 04:41 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 16th Jun 2023 04:41 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 16th Jun 2023 04:41 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 16th Jun 2023 04:41 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 16th Jun 2023 04:41 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 16th Jun 2023 04:41 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 16th Jun 2023 04:41 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 16th Jun 2023 04:41 pm













