जावलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध आ. शिवेंद्रराजे;

सातारा- सातारा- जावली मतदारसंघात हजारो कोटींची विकासकामे मार्गी लावून प्रत्येक गाव, वाडी, वस्तीतील लोकांना सुविधा पुरवण्याचे काम केले आहे. पर्यटन वाढ आणि रोजगार व व्यवसाय वृद्धीला चालना देण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. माझ्या मतदारसंघातील असंख्य लोक नवी मुंबई येथे नोकरी, धंद्यानिमित्त स्थायिक झाले आहेत. या सर्व मुंबईकरांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले असून यासाठी भविष्यातही कटिबद्ध राहीन, असा शब्द आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. 

नवी मुंबई येथे सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित संवाद मेळावा उत्साहात झाला. या मेळाव्यात आ. शिवेंद्रराजे बोलत होते. यावेळी माथाडी नेते नरेंद्र पाटील, बळवंतराव पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, मुंबईतील बाबाराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी, उपाध्यक्ष संदीप शेलार, के. के. शेलार, उद्योजक श्रीरंग केरेकर, दत्ताशेठ गावडे, कविता धनावडे, विजय सावले, विनोद शिंगटे आदी मान्यवरांसह नवी मुंबई, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, नेरुळ, भांडूप आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आ. शिवेंद्रराजेंनी मतदारसंघात असंख्य विकासकामे मार्गी लावून आमच्या गावाचा, भागाचा सर्वांगीण विकास केला आहे. आमच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच सहकार्य करतात. बाबाराजेंना विक्रमी मतांनी विजयी करून पुन्हा आमदार करू, असा निर्धार उपस्थित हजारो मुंबईकरांनी यावेळी व्यक्त केला. विविध योजना आणि विकासकामे मार्गी लावून आपल्या मतदारसंघाचा कायापालट केला आहे. सातारा व जावली तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ भागात पर्यटन वाढ व्हावी आणि त्यातून स्थानिकांना रोजगार व व्यवसाय निर्मिती व्हावी यासाठी प्राधान्य दिले आहे, असे आ. शिवेंद्रराजे म्हणाले. आगामी काळात मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून स्थानिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जाती. आपण सर्वांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. आपले आशीर्वाद आणि प्रेम कायम ठेवून मला विक्रमी मतांनी विजयी करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रराजेंनी मुंबईकरांना केले. 

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

 औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?

औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?

औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?

औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला