चतुर बेट चा साकव  पूल देखील पाण्याखाली गावाचा संपर्क तुटला

कोयना नदीला भयंकर पूर परिस्थिती आल्याने चतुर बेट गावाला जोडणारा लोखंडी साधा साकव पूल देखील आता पाण्याखाली केल्याने या गावाचा संपर्क तुटला आहे 

पाचगणी  : महाबळेश्वर तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून कोयना नदीला मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे यातच चतुडबेट गावाकडे जाणारा साकव पूल देखील पाण्याखाली गेल्याने चतुरबेट  घोणसपूर यासह चार गावांचा संपर्क तुटला आहे अशी माहिती सरपंच नंदा जाधव यांनी दिली आहे

कोयना नदीवर गतवर्षी झालेला अतिवृष्टीत चतुरबेट पूल वाहून गेला होता. त्यानंतर नागरिकांच्या दळणवळण सोयीसाठी बांधकाम विभागाकडून पर्यायी भरावा पाईप टाकून छोटा पूल तयार करण्यात आला होता 

मात्र तो देखील मोठ्या पावसाने वाहून गेला आता कोयना नदीला पूर आल्याने चतुरबेट  गाव व या परिसरातील दोन्हीही काठावरील गावातील नागरिकांना दळणवळण करता यावे यासाठी छोटा लोखंडी साकव पूल बनवण्यात आला होता तो साकव पूल देखील आता पाण्याखाली गेल्याने या दोन्ही काठावरील गावांचा पूर्णतः संपर्क तुटला आहे मोठ्या प्रमाणात पुराची दाहकता वाढल्याने या विभागामध्ये हाय अलर्ट देखील घोषित करण्यात आला आहे
 दरम्यान या परिसरात गेल्या वर्षी 24 जुलै रोजी मोठी अतिवृष्टी होऊन खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अनेक रस्ते पूल जमिनी वाहून गेल्या होत्या या विभागात गेल्या दहा दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे 
कोयना नदीला भयंकर पूर परिस्थिती आल्याने चतुर बेट गावाला जोडणारा लोखंडी साधा साकव पूल देखील आता पाण्याखाली केल्याने या गावाचा संपर्क तुटला आहे 
त्यामुळे या विभागात व गावाला जाणाऱ्या नागरिकांना अतिदक्षता इशारा देण्यात आला आहे। दरम्यान नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे तो पूल देखील आता पाण्याखाली असल्याने आणखीन उंच पूल बांधण्याची गरज देखील निर्माण झाली आहे

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला