श्री समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचे साताऱ्यात मोठ्या जल्लोषात स्वागत भव्य मिरवणुकीने समर्थ सदन येथे पादुका सात दिवसाच्या मुक्कामासाठी


दरम्यान समर्थ रामदास स्वामींच्या पादुका या समर्थ सदन येथे दिनांक 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान सात दिवसाच्या वास्तव्यासाठी आहेत.
सातारा : सज्जनगड येथील श्री राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी यांच्या श्री समर्थ सेवा मंडळांचा पुणे येथील हा पादुकांचा प्रचार दौरा संपवून समर्थ पादुका   पोवई नाका येथे या पादुकांचे  समर्थ भक्त विद्याधर बुवा रामदासी व योगेशबुवा रामदासी यांच्या द्वारे आगमन झाल्यावर  सातारा येथील वेदमूर्ती व न्यायशास्त्र अभ्यासक व संस्कृत भाषेचे जेष्ठ अध्यापक शंकरशास्त्री काशिनाथशास्त्री दामले यांचे शुभहस्ते पादुकांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

पादुकांचे स्वागत करण्यासाठी मंडळाचे  कार्याध्यक्ष डॉ.अच्युतराव गोडबोले व कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांचे सह रमेशबुवा शेंबेकर, प्रतिक रामदासी, वेदमूर्ती बोरीकर गुरुजी, अभिषेकबुवा दामले, बाळुबुवा कुलकर्णी रामदासी, समर्थ रामदास स्वामी भक्त मंडळाचे पदाधिकारी व मिरवणूक स्वागत समितीचे अध्यक्ष मोहन साठे, सचिव रामचंद्र नावलीकर, सहसचिव साहेबराव जांभळे तसेच समर्थ रामदास स्वामी भक्त मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण भंडारे, उपाध्यक्ष नारायण खरे, कार्याध्यक्ष आर.के.जाधव, सचिव अभय गोडबोले व खजिनदार मनोहर कुमठेकर व सर्व सदस्य भास्कर मेहेंदळे, अशोक गोडबोले, तात्या नावलिकर,रमण वेलणकर, राजाभाऊ कासट रवींद्र परांजपे ,केदार नाईक, सौ.लीना मेहेंदळे, सौ.कल्पना ताडे, समर्थ सदनचे व्यवस्थापक प्रवीण कुलकर्णी गुरुजी, राजू उर्फ मुरलीधर कुलकर्णी,  गजानन बोबडे, बबनराव सापते, रवी बुवा आचार्य, संतोष वाघ, सौ.देसाई वहिनी, धनराज लाहोटी, लाहोटी परिवारातील सदस्य आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी.. जय जय रघुवीर समर्थ ,..जय भवानी, जय शिवाजी.. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय..आदि जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. पोवई  नाका व्यापारी मंडळाच्या वतीने ही समर्थ पादुकांचे स्वागत करण्यात आले. रामदास स्वामींच्या आरतीनंतर शोभा यात्रा सूरू झाली.पादुकांचे स्वागत प्रसंगी मार्गावर भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तसेच  दरे बुद्रूक गावचे सांप्रदायिक भजनी मंडळाचे वारकरी पथक या मिरवणुकीची शोभा वाढवत होते.

पादुकांचे साताऱ्यात आगमन झाल्यावर पोवई नाक्यावरून मोठ्या समर्थ भक्तांच्या उपस्थितीत शहरातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी मिरवणुकीमध्ये प्रभू श्रीरामचंद्र  सीता देवी व हनुमानच्या मूर्ती भव्यरथात फुलांच्या सजावटीमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. हा भव्य मिरवणूक सोहळा  पोवई नाका येथून मल्हार पेठ पोलीस मुख्यालयावरून शेटे चौक मार्गे देवी चौक, राजपथ, मोती चौक मार्गे राजवाडा येथून समर्थ सदन येथे मिरवणूक मार्गावरून पादुका जात असताना मार्गावरील व्यापारी बंधूंनी तसेच अनेक सातारकर नागरिकांनी पादुकांचे स्वागत केले तसेच महिलांनी पंचारतींनी औक्षण करून पुष्पवृष्टी केली.

दरम्यान समर्थ रामदास स्वामींच्या पादुका या समर्थ सदन येथे दिनांक 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान सात दिवसाच्या वास्तव्यासाठी आहेत. यावेळी या रामभक्तांना समर्थांच्या पादुका आपल्या घरी नेऊन स्वहस्ते पाद्यपूजा करावयाची आहे त्यांनी समर्थ सदन येथे चौकशी करावी. तसेच सात दिवसाच्या या पादुका दौऱ्यामध्ये समर्थ सदन येथे दररोज सकाळी सहा ते सव्वा सहा या वेळेत काकड आरती, सव्वा सहा ते साडेसात यावेळेस समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांची महापूजा व आरती सकाळी आठ ते बारा या वेळेत सातारा शहरातील विविध प्रभागात सांप्रदायिक भिक्षा फेरी तसेच दुपारी साडेतीन ते साडेचार या वेळेत स्थानिक मंडळांचा भजन कार्यक्रम होऊन सायंकाळी साडेचार ते साडेपाच या वेळेत करुणाष्टके व  सवाया तसेच आरती होणार आहे. सात दिवस दिनांक 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी सहा ते साडेआठ या वेळेस समर्थ भक्त मकरंदबुवा रामदासी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे व रात्री नऊ वाजता शेजारती होणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त