आमदार शशिकांत शिंदे यांना युवकांच मोठें पाठबळ

सातारा कोरेगाव खटाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश

कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडी मधून आमदार शशिकांत शिंदे उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे असून त्यांच्या विरोधात विद्यमान आमदार महेश शिंदे महायुती मधून आमने-सामने उभे असताना मोठ्या प्रमाणात मतदार आमदार शशिकांत शिंदे यांना जाहीर पाठिंबा देत आहे जसजशी निवडणूक जवळ येईल तसा युवक वर्ग आमदार शशिकांत शिंदे यांना पाठिंबा देत आहे काहीही झालं तरी यावेळी परिवर्तन घडवून आणायचं असा निर्धार कोरेगावच्या जनतेने केला आहे 


 वडूथ ता. सातारा जरंडेश्वर येथील कार्यकर्त्यांनी निष्ठावंत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला उंबरमुळे खटाव तसेच मोळ येथील शेखर गाडगे हनुमंत वाघ सुरज वाघ असे असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना पाठिंबा देऊन महेश शिंदे यांना धक्का दिला आहे कोरेगावची जनता सुज्ञ आहे कोणत्याही भूलथापांना बळी न पडता मतदार यावेळी परिवर्तन घडवून आणणार याबाबत शंकाच नाही गेली 25 वर्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगावच्या जनतेला न्याय देण्याचे काम करत असताना विविध विकास कामांचा डोंगर उभा केला आहे याची जाणीव सर्वसामान्य जनतेला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आमदार शशिकांत शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी जनता पुढे येऊ लागली आहे. कोरेगावची जनता हुकूमशाहीला कंटाळली असल्याने आपल्या हक्काचा आमदार कोरेगावला पुन्हा मिळावा यासाठी युवक वर्ग तसेच ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांना मंत्री म्हणूनच सहकार्य करायचं असा निर्धार केला आहे.


आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त