सातारा ते चंचळी एसटी वरील चालक वाहकाचा मनमानी कारभार
प्रवाशांना निम्म्यातच सोडून करताहेत स्वतःचा मनमानी कारभार वृद्धांचे मात्र हालSatara News Team
- Tue 1st Aug 2023 11:35 am
- बातमी शेयर करा
सातारा : एसटी बस म्हणजे गोरगरिबांची लाल परी.ग्रामीण भागात तर या एसटीची नाळ लोकांपर्यंत जोडली गेलेली आहे परंतु काही उद्धट कर्मचाऱ्यांमुळे ही एसटी बदनाम होऊ लागली आहे असाच एक प्रकार सातारमध्ये घडत आहे.
सातारा किन्हई ते चंचळी अशी एसटी बस सातारा आगारातून निघते या गाडीतून अनेक वयोवृद्ध शाळेतील मुल प्रवास करतात परंतु गेल्या काही दिवसापासून साताऱ्यातून निघाल्यानंतर ही बस किन्हई येथेच थांबून चंचळी त जाणा-या प्रवाश्यांना येथेच उतरा असे चालक तथा वाहक जबरदस्ती सांगून तेथूनच माघारी येत आहे .किन्हई ते चंचळीअसं तीन किलोमीटरचा अंतर हे वयोवृद्ध, महिला ,म्हातारी माणसं, शाळेतील मुलं यांना चालत प्रवास करण्यास एसटी वरील चालक तथा वाहक भाग पाडत आहेत. कितीही विनंती केली तरी ते चंचळीत गावात एसटी येत नाही. चंचळी या गावात एसटी बस नेण्यास या गाडीवरील चालक तथा वाहक याना नक्की त्रास काय आहे हेच समजणं झालं आहे. एसटी आगारातून यांना या चंचळी गावात जाण्यास डिझेल पुरवत नाही का ? असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे चंचळी मधून सातारला प्रवास करणारे सुद्धा बरेच प्रवासी असतात परंतु चंचळी मध्ये एसटी न आल्याने यांना एक तर पायी किंवा कोणाच्यातरी टू व्हीलर वरून किन्हई येथे यावं लागतं त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत या एसटी चालक तथा वाहक यांना प्रवाशांनी कितीही विनंती केली तरी सुद्धा या प्रवाशांना किन्हई येथे सोडून हे उध्दट चालक वाहक स्वतःचा मनमानी कारभार करत असून प्रवाशांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. याला कोणीतरी लगाम घालणार का उद्धट चालक आणी वाहक यांच्यावर कारवाई होणार का ? असा सवाल चंचळी येथील ग्रामस्थांनी व प्रवाशांनी सातारा न्यूजशी बोलताना व्यक्त केला आहे
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Tue 1st Aug 2023 11:35 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Tue 1st Aug 2023 11:35 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Tue 1st Aug 2023 11:35 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Tue 1st Aug 2023 11:35 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Tue 1st Aug 2023 11:35 am
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Tue 1st Aug 2023 11:35 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Tue 1st Aug 2023 11:35 am
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Tue 1st Aug 2023 11:35 am
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Tue 1st Aug 2023 11:35 am
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Tue 1st Aug 2023 11:35 am
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Tue 1st Aug 2023 11:35 am
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Tue 1st Aug 2023 11:35 am










