साताऱ्यात महामार्गानजीक एकाची डोक्यात गोळ्या घालून हत्या .हत्या झालेला युवक शुक्रवार पेठेतील

सातारा : सातारा शहरा नजीक असलेल्या महामार्गावरील वाढे गावच्या हद्दीत एका हॉटेल परिसरात गोळीबार करत एकाची हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेला युवक शहरातील शुक्रवार पेठेतील असल्याची माहिती समोर येत आहे. युवकाच्या डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. गोळीबारानंतर मारेकरी फरार झाले आहेत काल कोयता नाचवत दहशत माजण्याची घटणा ताजी आसतानाच आज एकाची हत्या झाल्याने साताऱ्यात खळबळ उडाली आहे 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा शहरातील महामार्गावर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. गोळीबार झाल्याच्या थरारनंतर परिसरात खळबळ उडाली. वाढे फाट्यानजीक पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर हाॅटेल व्यावसाय चालतो. याच परिसरात हा गोळीबार झाला आहे. गोळीबाराचे कारण अद्याप समोर आले नाही.

घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या गोळीबारामुळे हाॅटेल व्यावसायिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण आहे. सदरचा मृत्यू झालेला युवक सातारा शहरातील शुक्रवार पेठेतील असून त्याच्यावर सातारा जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे. त्याठिकाणी त्याच्या कुटुंबियांनी, मित्रांनी धाव घेतली आहे. सातारा पोलिस अधिकांना ही गुन्हेगारी थांबण्यात यश येणार का ?.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त