BREAKING NEWS : अंधारी येथे संशयास्पदरीत्या अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला

मृत्यूमागचे हॉटेल कनेक्शन शोधण्याचे मेढा पोलिसांसमोर आव्हान

सातारा : साताऱ्याच्या पश्चिमेकडील भागात कास पठार नजीक असलेल्या अंधारी (ता.जावली) येथे मुख्य रस्त्याच्या शेजारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. मृताच्या शरीरावर मारहाण झाल्याच्या खुणा दिसत असून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान घटनास्थळापासून पूर्वेला कास पठार मोठ्या अंतरावर आहे. त्या दिशेला घनदाट जंगल आहे. कोणत्याही प्रकारची लोकवस्ती नाही. मात्र दुसऱ्या बाजूला पश्चिमेकडे खाली बामनोलीच्या दिशेने रस्त्याकडेला अनेक हॉटेल आहेत. याठिकाणी हा व्यक्ती पार्टीसाठी आला असावा, यावेळी झालेल्या भांडणातून खून झाल्याचा संशय स्थानिकांतून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे परिसरातील हॉटेल कनेक्शन शोधण्याचे मेढा पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अंधारी बस स्टॉपच्या मुख्य रस्त्यापासून कास पठारच्या दिशेने ७०० मीटर अंतरावर एका व्यक्तीला आज सकाळी अज्ञाताचा मृतदेह आढळला. त्यांनी तात्काळ याबाबत गावातील नागरिकांना कळविले. गावातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर मेडा पोलिसांना याबाबत फोनवरून माहिती दिली. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू होते, मात्र ओळख पटू शकली नाही. घटनास्थळी मेढा पोलीस दाखल झाले आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त