औंधयेथील 28 वर्षीय तरुणाची गोपूज येथे निर्घृण हत्या : एक ताब्यात

औध : काल सोमवार दि. 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजणेच्या सुमारास औंधनजीक असलेल्या गोपूज ता. खटाव गावचे हद्दीत 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने नागरिकांनी औंध पोलीसांना घटनेची माहिती कळवल्या नंतर औध पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून संबंधित तरुण हा मृतदेह रामदास दंडवते यांचा आसल्याच पोलींना माहीती मिळाली तात्काळ आरोपीचा शोध घेत खरशींगे गावातील रोहन मल्हारी मदणे या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच गुरुराज दत्तात्रय मदणे या आरोपीचा शोध सुरू आहे 

 याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, गोपूज नजीकच्या सुतार खडवी नावाचे परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह असल्याची माहिती औंध पोलिसांना मिळाली. त्यावेळी या परिसरात मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सदर तरुणाचा मृतदेह पाहता ओळख पटविणे कठीण होते मात्र औंध पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मृतदेहाची ओळख पटवत सदर मृतदेह कोणाचा आहे व तो या परिसरात कसा आला याची शहानिशा करण्याचे काम तात्काळ सुरू केले. रोहन मदणे व गुरुराज मदणे, दोघेही रा. खरशींगे यांनी संगनमताने रामदास दंडवते याचा खून केल्याची तक्रार लीला दंडवते यांनी केल्याने . रोहन मदणे या संशयित आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश आले आहे तर गुरुराज मदणे या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.हा खुन यानी का केला याचा तपास औंध पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एम. मते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला