जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीसाहेब 'मॅप्रोवर कारवाई झालीच नाही ओ'?

सातारा  : सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रशासकीय बदली पुणे येथे झाली आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पाचगणी येथील अनाधिकृत बांधकाम पाडण्याचा सपाटा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडुन लावण्यात आला होता. 


मात्र महाबळेश्वर तालुक्यातील अनाधिकृत बांधकामावर हातोडा टाकत असताना गुरेघर ता. महाबळेश्वर येथील देवस्थान जागेवर अनाधिकृत वाणिज्य वापर करणाऱ्या मॅप्रोवर कोणतीच कारवाई न करण्याच जळजळीत सत्य समोर आले आहे. 

 सातारा जिल्हाअधिकारी म्हणुन साताऱ्याची जबाबदारी मिळाल्यावर जिल्हाधिकारी डुडी यांनी कोणाचीच मुलाहीजा न ठेवता महाबळेश्वर शहर, भोसे, खिंगर, आदी ठिकाणावरील अनधिकृत बांधकाम पाडत महसुल विभागाचा दबदबा निर्माण केला. मात्र कायद्यामध्ये समता असावी लागते, यांचा प्रत्यय मात्र डुडीसाहेब दाखवु शकले नाहीत. गुरेघर येथील मॅप्रोवरील थांबलेल्या कारवाईवरुन लपुन राहीले नाही. 

 सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील धनदांडग्यांची बांधकामे जमिनदोस्त करत असताना काही पांढऱ्या बगळ्यांच्या हस्तक्षेपामुळे डुडीसाहेब यांनी नेहमी काढता पाय घेतला. देवस्थान जागेवर उभारलेले वाणिज्य प्रकल्प २४ तासाची नोटीस देवुनही कारवाई केली जात नाही. नक्की काय गौडबंगाल आहे, हा आजही चर्चेचा विषय झाला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीसाहेब आपण प्रशासनात गतिमानता आणली. महसुल विभागात होणारी सर्वसामान्यांची ससेहोलपट आपण रोखु शकला नाही. मात्र आपण महाबळेश्वर तालुक्यातील धनदांडग्यांचं देवस्थान भुखंडावरील वाणिज्य स्वरुपाच अनाधिकृत व्यवसाय बंद करण्यात आपण कारवाई करु शकला नाही, हे अधोरेखीत सत्य आपल्या कार्यालयाकडे कचरा म्हणून पडलेल्या तक्रारीवरुन लपुन राहीले नाही, हे मात्र सत्य.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त