अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोन इसमांना अटक 2 देशी बनावटीची पिस्टल, 2 मॅक्झीन, 2 जिवंत काडतुसे जप्त

कराड  दि.19/12/2024 रोजी पोलीस निरीक्षक श्री. अरुण देवकर यांना त्यांचे गोपनिय बातमीदार यांचे मार्फत बातमी मिळाली आहे की, वाठार, ता. कराड गावचे हद्दीतील कोल्हापुर ते सातारा जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 चे सर्व्हिस रोडवर नवनाथ महाराज यांचे मठाचे समोर रोडवर दोन इसम देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे विक्री करण्याकरीता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी सहा. पोलीस निरीक्षक श्री. रोहित फार्णे यांचे अधिपत्याखाली एक पथक तयार करुन त्यांना मिळाले बातमीचा आशय सांगुन सदर ठिकाणी जावुन सापळा लावुन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.


 त्याप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक श्री. रोहित फार्णे यांचे पथकाने कराड तालुका पोलीसांचेसह वाठार, ता. कराड गावचे हद्दीतील नवनाथ महाराज यांचे मठाचे समोर सापळा लावला असता सदर ठिकाणी संवंशयित सुरज गणपत चव्हाण वय 20 वर्ष राहणार रेठरे बुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा , ओमकार युवराज थोरात वय 25 वर्ष राहणार ओंड ता. कराड जिल्हा सातारा. हे त्यांचेकडील मोटार सायकल वरुन येत असताना दिसले. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटार सायकलवरील दोन्ही इसमांना शिताफीने पकडुन त्यांची व मोटार सायकलची झडती घेतली असता त्यांचे कब्जात 1,95,500/- रुपये किंमतीची दोन देशी बनावटीची पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, दोन मोबाईल हॅन्डसेट व एक मोटार सायकल मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द कराड तालुका पोलीस ठाणे येथे गुरनं. 799/2024 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3(1),25 प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आला आहे.

 मा.श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व मा. डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा व त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप कराड तालुका पोलीस ठाणे, श्री. सहा.पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पारितोष दातीर, साक्षात्कार पाटील, पोलीस अंमलदार सफौ. शिवाजी गुरव, अतिष घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, अमित सपकाळ, अमित माने, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, स्वप्निल कुंभार, गणेश कापरे, मोहन पवार, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, , सचिन ससाणे, रवीराज वर्णेकर तसेच कराड तालुका पोलीस ठाणे कडील सज्जन जगताप, उत्तम कोळी, मोहित गुरव यांनी सदरची कारवाई केली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा व डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.


 सातारा पोलीस दलाकडुन माहे नोव्हेंबर 2022 पासुन ते आज पावेतो 106 देशी बनावटीची पिस्टल, 4 बारा बोअर, 233 जिवंत काडतुसे व 383 रिकाम्या पुंगळ्या, 4 मॅक्झीन जप्त करण्यात आलेल्या आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त