सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील

सातारा : सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून बदली झालेली आहे. त्यांच्या जागेवर संतोष पाटील यांची वर्णी लागली आहे. सातारा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर 7 जून 2023 रोजी त्यांच्या जागेवर सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून वर्णी लागली होती. गेल्या दीड वर्षाच्या कार्यकाळात डूडी यांनी अनेक लोकाभिमूख निर्णय घेवून जिल्ह्याच्या विकासाला चालना दिली होती. महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्‍वरमध्ये बोकाळलेल्या अतिक्रमणांविरोधात डूडी यांनी खमकी भूमिका घेऊन ही अतिक्रमणे जमीनदोस्त केली होती. तसेच कास येथील अतिक्रमणांविरोधातही डूडी यांनी हातोडा उगारलेला होता. दरम्यान, आज राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार डूडी यांची बदली पुणे जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त