हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच पेशंटचा मृत्यू झाला असल्याचा डॉ. भूषण पाटील यांचा दावा

सातारा : सातारा येथील मंगळवार पेठेतील अक्षय अशोक नलावडे (वय २६ वर्षे ) या युवकाच्या मृत्यूप्रकरणी मंगलमूर्ती हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अक्षम्य हलगर्जीपणा केल्यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून नातेवाईकांनी केल्यानंतर हॉस्पिटलसमोर तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संपर्क साधला डॉक्टर भूषण पाटील यांनी सदर पेशंटचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच झाला असल्याचा दावा केला आहे. डॉक्टर भूषण पाटील म्हणाले कि, दि. २७ डिसेंबर रोजी सदर पेशंटला हृदयविकाराचा त्रास होत असल्याने त्यास मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सदर रुग्णाची अँजिओग्राफी केल्यानंतर त्याचा रिपोर हा नॉर्मल असून रुग्णाचे हृदय कमकुवत असल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांना सांगण्यात आले असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले. रुग्णाचे हृदय कमकुवत असून त्यास मृत्यूचा धोका असल्याने त्यास देखरेखेखाली ठेवण्यात आले होते. परंतु उपचारासाठी रुग्णाच्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने व आमचा रुग्ण ठीक असून त्यास डिस्चार्ज देण्याचा नातेवाईकांनी आग्रह केल्याने सदर रुग्णास घरी सोडण्यात आले होते. मात्र, दोन दिवस चांगले गेल्यानंतर आज गुरुवारी सकाळी रुग्णास त्रास होऊ लागल्याने रुग्णास त्याचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते, परंतू हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच अक्षय अशोक नलावडे या रुग्णाचा मृत्यू झाला होता. नातेवाईकांना हे सांगितल्यानंतर त्यांनी आमच्यावरच आरोप करत गोंधळ घातल्याचे स्पष्टीकरण डॉक्टर भूषण पाटील यांनी दिले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त