डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
राजाभाऊ बोन्द्रे
- Wed 31st Dec 2025 02:11 pm
- बातमी शेयर करा
फलटण : नुकतीच फलटण नगरपालिकेची 2025 सार्वत्रिक निवडणूक पार पडली यामध्ये भाजपा राष्ट्रवादीचे 18 तर राजे गटाचे( एकनाथ शिंदे) नऊ नगरसेवक जनतेने निवडून दिले. नगराध्यक्षपदी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची जनतेतून झालेली निवड पाहता फलटणमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण झाले आहे भाजपा सेल व्यापारी आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यकांत दोशी यांनी या निवडणुकीत व्यापारी वर्ग आणि जैन बांधवांचे संघटन बांधून खंबीरपणे भाजपा राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहून नगराध्यक्ष पदासाठी बहुमोल मदत केली. डॉक्टर सूर्यकांत दोशी हे जैन समाजातील सर्वच क्षेत्रात नेहमीच सक्रिय सहभाग घेत असतात शहरातील सांस्कृतिक धार्मिक राजकीय सामाजिक तसेच शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये सामाजिक बांधिलकी जोपासत समाजासाठी समाजाच्या हितासाठी काम करणारी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची फलटण शहरात ओळख आहे जैन समाजातील तसेच इतर समाजातील अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमास नेहमीच त्यांचा मोलाचा वाटा असतो व्यवसायाने व्यापारी असल्याने अत्यंत योजनात्मक आणि यशस्वी कारकीर्द करत जैन समाजातील विविध धार्मिक कार्यक्रम मिरवणुका जैन समाजाच्या बाबतची तळमळ आणि जैन समाजाच्या हितासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणे तसेच जैन समाजाच्या आचार्य शांतीसागर महाराज महोत्सवात महावीर जयंती महोत्सवात नेहमीच ते आघाडीवर असतात.
शहरातील बहुसंख्य व्यापारी वर्गाशी सलोख्याचे संबंध असून नेहमीच व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी समस्यांसाठी सुद्धा ते शासनाकडे आणि राजकीय त्यांच्याकडे पाठपुरावा करतात.
शहरातील मूलभूत सुधारणा करण्यामध्ये नेहमीच त्यांची योजनाबद्ध आणि शिस्तबद्ध प्रक्रिया नागरिकांना दिसून येते. शहरातील नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या तसेच सामान्य जनसामान्य पर्यंतच्या हितसंबंधांमुळे सर्व क्षेत्रातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची फलटण शहरात ओळख आहे.
राजकीय क्षेत्रात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समवेत नेहमीच भाजपा राष्ट्रवादीला मोलाचे भर देण्याचे काम ते आजपर्यंत करत आले आहेत विधानसभा आणि फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत खंबीरपणे भाजपाच्या पाठीशी उभे राहून पक्षाची ध्येयधोरणे आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यात व्यापारी वर्गाच्या साह्याने नेहमीच कार्यरत असतात.
भाजपामध्ये बऱ्याचशा आजी-माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा प्रवेशाच्या वेळी त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे भाजपा पक्ष संघटन बळकट करण्यासाठी नेहमीच सक्रिय असतात. पुणे येथील जैन बोर्डिंग च्या जागेच्या समस्या बाबत संपूर्ण महाराष्ट्रात आवाज उठवला होता याबाबतचे निवेदनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत दाद मागण्यात येण्यासाठी दिले होते. तसेच युवा पिढीला जैन साहित्याची ओळख होण्यासाठी व मार्गदर्शन मिळण्यासाठी 27 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर फलटण येथे जैन साहित्य संमेलनात भाग घेऊन यशस्वीरित्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याविषयी जैन समाज व व्यापाऱ्यांनी या उपक्रमाबद्दल विशेष कौतुक केले होते.अशा समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वाचा फलटण नगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लागावी यासाठी व्यापारी वर्ग व जैन बांधव यांची आग्रही मागणी माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर भाजपाकडे करण्यात येत आहे व्यापारी वर्ग आणि जैन बांधवांच्याकडून लवकरच याबाबत माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्याशी भेट घेऊन स्वीकृत नगरसेवक साठी सिटी बझार उद्योग समूहाचे सर्वेसर्वा डॉक्टर सूर्यकांत दोशी यांची निवड करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 31st Dec 2025 02:11 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 31st Dec 2025 02:11 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Wed 31st Dec 2025 02:11 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Wed 31st Dec 2025 02:11 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Wed 31st Dec 2025 02:11 pm
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Wed 31st Dec 2025 02:11 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 31st Dec 2025 02:11 pm
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Wed 31st Dec 2025 02:11 pm
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 31st Dec 2025 02:11 pm
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Wed 31st Dec 2025 02:11 pm
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Wed 31st Dec 2025 02:11 pm
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Wed 31st Dec 2025 02:11 pm










