राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
Satara News Team
- Wed 19th Aug 2026 04:51 pm
- बातमी शेयर करा
पुणे : महायुतीच्या राजकारणात राज्याच्या पातळीवर मैत्रीचे गोडवे गायले जात असले, तरी स्थानिक पातळीवर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला आहे. पुण्यातील अमोल बालवडकर प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर थेट निशाणा साधला असून, स्थानिक विकासकामे आणि निधी वाटपाच्या मुद्द्यावर महायुतीतील कथित ‘दुहेरी मैत्री’ उघड झाल्याचा दावा केला आहे.
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या प्रकरणात भाजपने घेतलेल्या भूमिकेचा संदर्भ देताना शशिकांत शिंदे यांनी पुण्याच्या महापौरांच्या निधीबाबतच्या स्पष्ट विधानाचा दाखला दिला. “आपली मैत्री फक्त राज्यातच राहील, स्थानिक बाबतीत बोलूही नका,” या भूमिकेतून महायुतीतील स्थानिक राजकारणाचे वास्तव समोर आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यात सत्तेसाठी मैत्री आणि स्थानिक पातळीवर मात्र निधी व विकासकामांमध्ये दुय्यम वागणूक, असा विरोधाभास असल्याचा त्यांचा आरोप आहे.
“पुण्याचे महापौर बोलले म्हणून पुणेकरांना कळले; पण हे चित्र प्रत्येक जिल्ह्यात आहे,” असा दावा करत शशिकांत शिंदे यांनी महायुतीच्या स्थानिक राजकारणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सोलापूर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला निधी वाटपात योग्य स्थान दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. प्रचाराच्या वेळी ‘महायुती’चा नारा आणि विकासकामांसाठी निधी देताना मात्र ‘महायुती’चा विसर, अशी बोचरी टीका त्यांच्या पोस्टमधून करण्यात आली आहे.
स्थानिक विकासाच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसला सातत्याने दुय्यम स्थान दिले जात असल्याचे सांगत शशिकांत शिंदे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांनाही अप्रत्यक्षपणे स्पष्ट संदेश दिला आहे. पक्षाचा विस्तार करायचा असेल तर केवळ सत्तेतील समीकरणांवर अवलंबून न राहता कठोर आणि स्पष्ट भूमिका घेण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी सूचित केले आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे यांची ही पोस्ट केवळ निधी वाटपावरील नाराजी नसून महायुतीतील स्थानिक राजकीय समीकरणांवर केलेला थेट प्रहार मानला जात आहे.
पोस्टच्या शेवटी “जशास तसे…..” असा सूचक इशारा देत त्यांनी “Miss u अजितदादा ????” अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे या पोस्टला राजकीय चर्चेची आणखी एक किनार मिळाली आहे. अजित पवार यांच्याशी असलेल्या जुन्या राजकीय समीकरणांची आठवण करून देतानाच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर शशिकांत शिंदे यांनी उपरोधिक भाष्य केल्याचे दिसून येते.
दरम्यान, शशिकांत शिंदे यांच्या या भूमिकेमुळे महायुतीतील सत्तासंतुलन, स्थानिक पातळीवरील निधी वाटप आणि मित्रपक्षांना दिल्या जाणाऱ्या राजकीय वागणुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यात महायुतीची सत्ता आणि स्थानिक पातळीवर मित्रपक्षांमध्येच निधीवरून कुरघोडी, असा आरोप होत असेल तर ही मैत्री नेमकी सत्तेपुरतीच आहे का? हा सवाल आता या पोस्टच्या निमित्ताने राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.
स्थानिक बातम्या
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Wed 19th Aug 2026 04:51 pm
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Wed 19th Aug 2026 04:51 pm
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Wed 19th Aug 2026 04:51 pm
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Wed 19th Aug 2026 04:51 pm
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Wed 19th Aug 2026 04:51 pm
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Wed 19th Aug 2026 04:51 pm
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Wed 19th Aug 2026 04:51 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Wed 19th Aug 2026 04:51 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Wed 19th Aug 2026 04:51 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Wed 19th Aug 2026 04:51 pm
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Wed 19th Aug 2026 04:51 pm
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Wed 19th Aug 2026 04:51 pm
-
हातगेघर ठराव फसला; जावळीतील राजकारण तापले, मानकुमरे बंधूंचा शिंदेंवर थेट राजकीय हल्लाबोल
- Wed 19th Aug 2026 04:51 pm













