दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
Satara News Team
- Sat 15th Aug 2026 03:19 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्हा पोलिस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस उपनिरीक्षक (PSI) रऊफ सय्यदकरीम इनामदार यांना भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालयाकडून उत्कृष्ट सेवापदक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या या सन्मानामुळे सातारा पोलिस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना उत्कृष्ट सेवापदक तसेच अतिउत्कृष्ट सेवापदक जाहीर करण्यात आले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील अधिकारी व अंमलदारांचाही समावेश आहे.
सातारा आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रऊफ सय्यदकरीम इनामदार यांच्या दीर्घकालीन, निष्ठावान आणि निष्कलंक सेवेसाठी त्यांची उत्कृष्ट सेवापदकासाठी निवड करण्यात आली आहे. पोलिस सेवेत प्रामाणिकपणे बजावलेल्या कर्तव्याची केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतलेली दखल म्हणून या सन्मानाकडे पाहिले जात आहे.
सातारा जिल्ह्यातील एकूण १० अधिकारी-अंमलदारांना अतिउत्कृष्ट सेवापदक, तर १६ अधिकारी-अंमलदारांना उत्कृष्ट सेवापदक जाहीर झाले आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा पोलिस दलाच्या कामगिरीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी पदकासाठी निवड झालेल्या सर्व अधिकारी-अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेसारख्या संवेदनशील विभागात कार्यरत असताना दीर्घकाळ प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या PSI रऊफ इनामदार यांच्या कार्याची केंद्र सरकारने दखल घेतल्याने हा सन्मान त्यांच्या सेवेला मिळालेली महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल पोलिस दलातून तसेच विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
स्थानिक बातम्या
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Sat 15th Aug 2026 03:19 pm
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Sat 15th Aug 2026 03:19 pm
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Sat 15th Aug 2026 03:19 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Sat 15th Aug 2026 03:19 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Sat 15th Aug 2026 03:19 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sat 15th Aug 2026 03:19 pm
संबंधित बातम्या
-
फलटणच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित
- Sat 15th Aug 2026 03:19 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Sat 15th Aug 2026 03:19 pm
-
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sat 15th Aug 2026 03:19 pm
-
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 15th Aug 2026 03:19 pm
-
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 15th Aug 2026 03:19 pm
-
औंध पोलीस स्टेशनकडून त्वरीत कारवाई: ट्रक चालकाची जबरदस्तीने लूट करणाऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल
- Sat 15th Aug 2026 03:19 pm
-
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Sat 15th Aug 2026 03:19 pm
-
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sat 15th Aug 2026 03:19 pm











