वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

सातारा  सातारा तालुक्यातील वाढे गावातील जमीन आणि हॉटेल व्यवसायाच्या ना हरकत दाखल्यावरून गंभीर प्रकार समोर आला आहे. ग्रामसेवक सुप्रिया भोसले यांनी सातारा तालुका पोलिसांसमोर दिलेल्या खबरी जबाबात मूळ ना हरकत दाखल्यात खाडाखोड करून बनावट सही आणि शिक्क्यांच्या आधारे दुसरा ना हरकत दाखला तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे.


वाढे ग्रामपंचायतीच्या १५ डिसेंबर २०१६ रोजीच्या ठरावानुसार निलेश बबन नलावडे यांना ‘हॉटेल लकीस्टार’ व्यवसायासाठी २१ डिसेंबर २०१६ रोजी ना हरकत दाखला देण्यात आला होता. मात्र, याच दाखल्यात फेरफार करून गट क्रमांक १२३ मधील मिळकतीसाठी सुरेश सदाशिव नलवडे यांच्या नावाने १९ एप्रिल २०१८ रोजीचा वेगळा ना हरकत दाखला तयार करण्यात आल्याचा आरोप आहे.


या प्रकरणाची पंचायत समिती स्तरावर चौकशी झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी सुरेश सदाशिव नलवडे, शंकर भिमराव चव्हाण, प्रभाकर सदाशिव नलवडे आणि विकास सोमचंद नलवडे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंद करण्याचे लेखी आदेश दिल्याचे जबाबात नमूद आहे.


दरम्यान, अर्जदार विशाल सुधाकर नलवडे यांनी हा बनावट दाखला नेमका कधी आणि कुणाकडून मिळाला, याबाबत निश्चित माहिती दिली नसल्याचेही ग्रामसेवकांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे हा बनावट दाखला नेमका कोणी तयार केला? मूळ कागदपत्रात फेरफार कोणी केला? बनावट सही-शिक्के कुणी वापरले? आणि या कागदपत्राचा नेमका गैरवापर कशासाठी करण्यात आला? याचा तपास आता पोलिसांसमोर महत्त्वाचा ठरणार आहे.


ग्रामसेवकांच्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधातही चौकशीची मागणी करण्यात आली असून, संशयित व्यक्तींची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे वाढे ग्रामपंचायतीच्या या कागदपत्र प्रकरणाचा तपास आता कोणते नवे धागेदोरे उघड करतो, याकडे सातारा तालुक्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची सत्यता बाहेर येण्यासाठी विशाल सुधाकर नलवडे यांनी दोन वर्ष संघर्ष केला आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला