किल्ला स्पर्धेत अंबवडे गावाला दुर्गवीर ग्राम चषकाचा मान
भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या हस्ते बक्षीस वितरणSatara News Team
- Wed 20th Dec 2023 05:44 pm
- बातमी शेयर करा
सातारा : येसूबाई फाउंडेशन व जिज्ञासा इतिहास संशोधक संवर्धन संस्था व हिंदवी पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक दहा ते पंधरा नोव्हेंबर यादरम्यान किल्ला स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट सादरीकरणामुळे फिरत्या चषकाचा मान सातारा तालुक्यातील किल्ल्यांचे गाव असणाऱ्या अंबवडे गावाला मिळाला आहे भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या हस्ते फिरता चषक आणि प्रमाणपत्र अंबवडे गावाला प्रदान करण्यात आले
अंबवडे गावातील राजेश जाधव, सचिन देशमुख, गुलाब जाधव, उमेश जाधव, अर्जुन धोंडवड व आर्यन जाधव इत्यादी सदस्यांनी हे बक्षीस स्वीकारले येथील हिंदवी पब्लिक स्कूलच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर ,भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ताजी थोरात, छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे,भाजप सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी अर्थ राज्यमंत्री भागवतजी कराड यांचे स्वीय सहायक अमित चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, जिज्ञासा मंचचे निलेश पंडित व हिंदवी पब्लिक स्कूलचे संस्थापक अमित कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली . त्यानंतर येसूबाई फाउंडेशन च्या वतीने विविध गटातील बक्षीसे जाहीर करण्यात आली वैयक्तिक गटामध्ये प्रथम क्रमांक सचिन पवार,द्वितीय क्रमांक रेहांना /जहिर बागवान , तृतीय क्रमांक कु.नमिता भिडे यांना मिळाला .सांघिक गटामध्ये प्रथम क्रमांक शिव संकल्प ग्रुप, द्वितीय क्रमांक हिंदवी पब्लिक स्कूल व तृतीय क्रमांक एस टी कॉलनी- विराज तिरोडकर यांना मिळाला
यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये शिवकालीन किल्ल्यांचे मोठे महत्त्व आहे .गड किल्ल्यांचे संवर्धन आणि त्या किल्ल्यांच्या ऐतिहासिक परंपरा याची पुढील पिढीला माहिती होणे गरजेचे आहे त्या दृष्टीने किल्ले स्पर्धांचे येसूबाई फाउंडेशनने केलेली नियोजन हे अत्यंत कौतुकास्पद आहे . या स्पर्धा जोरकसपणे पार पडत आहेत याबाबत येसुबाई फाउंडेशन आणि जिज्ञासा संशोधन संस्था व हिंदवी पब्लिक स्कूल यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे शिवकालीन किल्ला स्पर्धेच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना चांगलाच वाव मिळत आहे या किल्ला स्पर्धा अशा कलागुणांचे एक सशक्त व्यासपीठ ठरावे अशी अपेक्षा धैर्यशील कदम यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली . l प्रास्ताविक व सूत्रसंचालन संदीप वाघुलकर यांनी केले
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 20th Dec 2023 05:44 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 20th Dec 2023 05:44 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Wed 20th Dec 2023 05:44 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Wed 20th Dec 2023 05:44 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Wed 20th Dec 2023 05:44 pm
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Wed 20th Dec 2023 05:44 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 20th Dec 2023 05:44 pm
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Wed 20th Dec 2023 05:44 pm
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 20th Dec 2023 05:44 pm
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Wed 20th Dec 2023 05:44 pm
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Wed 20th Dec 2023 05:44 pm
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Wed 20th Dec 2023 05:44 pm










