डिजे मुक्त गणेशोत्सव करण्यावर लक्ष केंद्रित करावे. - मा.दत्तात्रय दराडे.

डिजे चा वापर केल्यास डिजे मालकासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर हमखास गुन्हा दाखल.
Focus should be on making DJ free Ganeshotsav. - Mr. Dattatraya Darade.

औंध : गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारी च्या विळख्यात असताना गणेशोत्सव साजरा करता आला नाही. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव पुर्णतः शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत पारंपरिक वाद्यांचा वापर करून शांततेत, भक्तिमय वातावरणात व सुरक्षित साजरा करा, नियम अटींचे कायदेशीररीत्या पालन करत सहकार्य करावे. शासनाकडून डीजेला परवानगी नाहीच; मात्र त्यातूनही कोणी डीजे लावण्याचा प्रयत्न केल्यास डीजे-मालकासह गणेश मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यामुळे नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा,' असे आवाहन औंध पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले.आँध पोलीस स्टेशनमध्ये गणेशोत्सवानिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी औंध आणि पुसेसावळी भागातील ४१ गावांतील पदाधिकारी, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, सदस्य, मंडळांचे अध्यक्षांची प्रमुख उपस्थिती होती.न्यायालयाने डीजेवर बंदी घातली आहे. त्यामुळे मंडळांनी देखील डीजेचा वापर न करता हा सोहळा नियमांचे पालन करून साजरा करणे गरजेचे आहे. असा प्रकार करताना जर कोणी आढळला तर संबंधित डीजे मालकासह मंडळाच्या अध्यावर गुन्हा नोंद केला जाईल,असा इशारा दराडे यांनी दिला.यावेळी दराडे म्हणाले, 'गणेशोत्सव'कालावधीत कोणाच्या भावना दुखावतील, असे कृत्य होऊ नये, गणेशाची मूर्ती ज्या ठिकाणी बसविली जाणार आहे, त्याठिकाणी वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये याची जबाबदारी घ्यावी, जे कोणी या काळात चुकीच्या अफवा पसरवतील त्यांची नावे आपण गुपचूप पोलीस स्टेशनला कळवावीत,आपली नावे गुप्त ठेवली जातील,सर्व पदाधिकाऱ्यांनी आमच्याकडून गणेशोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणी करून परवानगी घ्यावी. मंडळांना पोलीस प्रशासनाकडून पुरेपूर सहकार्य केले जाईल.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला