पांचगणीच्या बंद इटॅाईलेट बाबत ठेकेदार कपंनीवर कारवाई न करणा-या मुख्याअधिकारी निखील जाधव यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश .

पाचगणी : पाचगणी नगरपालीकेच्या हद्दीमध्ये २ कोटी ५० लाख रुपये खर्चकरुन . उभारण्यात आलेले इटॅाईलेट गत २ वर्षाहुन अधिक काळ बंद आहेत . याबंद इटॅाईलेट बाबात ठेकेदार कपंनीवर कारवाई न करणा-या पांचगणी मुख्याअधिकारी निखील जाधव यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार पुणे येथील प्रादेशिक महानगरपालिका प्रशासन संचालनालय यांच्याकडे करण्यात आली आहे . या तक्रारीची गंभीर दखल पुणे येथील प्रादेशिक महानगरपालिका प्रशासन यांनी घेत सातारा जिल्हाप्रशासन अधिकारी यांना याबाबत चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . सातारा जिल्हा सहाय्यक आयुक्त नगरपालीका प्रशासन अजिक्य पाटील यांनी पाचगणी मुख्याअधिकारी निखील जाधव यांना तात्कळ सात दिवसात मुद्देनिहाय स्वयमस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे .

 पांचगणी नगरपालीकेच्या हद्दीतील १५ ठीकाणी बसवण्यात आलेले इटॅाईलट बंद अवस्थेत आहेत . या इटॅाईलेट उभारण्याकरीता सुमारे २ कोटी ५० लाख रुपय खर्च करण्यात आले आहेत मात्र बंद पडलेल्या इटॅाईलेट कंनीवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही . याबाबत वेळोवेळी तक्रारी करुन देखील पांचगणी मुख्याअधिकारी निखील जाधव यांनी ठेकेदार कपंनीला पाठीशी घालुन थातुरमातुर उत्तर देत इटॅाईलेट बंद असताना देखील . पर्यटनस्थळी पर्यटकांना सेवा उपलब्ध करुन देण्यात असल्याचे थातुर मातुर उत्तर तक्रारदाराला कळवले मात्र इटॅाईलेट बंद बाबत कोणतीच कारवाई केली नसल्याचे समोर आल्यामुळे . पांचगणी नगरपालीका मुख्याअधिकारी निखील जाधव यांची बंद इटॅाईलेट कपंनीबाबबत कारवाई न करणा-या यांची चौकशी होवुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुणे येथील प्रादेशिक महानगरपालिका प्रशासन संचालनालय याच्याकडे करण्यात आली आहे . पाचगणी इटॅाईलेट बाबत तक्रारीची गंभीर दखल सातारा जिल्हा सहाय्यक आयुक्त नगरपालीका प्रशासन अजिक्य पाटील यांनी घेत . मुख्याअधिकारी पांचगणी निखील जाधव यांनी तात्कळ अहवाल सादर करण्याचे आदेश पत्राद्वारे देण्यात आले आहेत . पांचगणी नगरपालीकेच्या बंद इटॅालेट बाबात ठेरेदार कपंनीवर कारवाई होणार की ठेकेदार कपनीला पाठीशी घालणा-या मुख्याअधिकारी निखील जाधव यांच्या कारवाईची टांगती तलवार राहणार याबाबत आता औत्सुक्य लागुन राहीले आहे .

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त