तीन गुन्हेगार दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार

पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आदेश पारित

सातारा : सातत्याने शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणार्‍या तीनजणांना दोन वर्षांसाठी संपुर्ण सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पारित केले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा परिसरातील शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख अभिषेक ऊर्फ सोमनाथ गणेश आवारे, वय 22 वर्षे, रा. कपीला दुध डेअरी समोर कोंडवे, ता. जि. सातारा, टोळी सदस्य - ओेंकार संदिप थोरात, वय 20 वर्षे, रा. आझाद बेकरीच्या पाठीमागे मोळाचा ओढा सातारा आणि टोळी सदस्य - रोहन विलास थोरात,वय 21 वर्षे,रा.मतकर कॉलनी झोपडपट्टी सातारा, ता.जि.सातारा यांच्या टोळीवर शाहुपूरी पोलीस ठाण्यात दरोडा, खुनाचा प्रयत्न करणे, घरफोडी- चोरी करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत पोहोचवून शिवीगाळ दमदाटी करणे असे बरेचसे गुन्हे दाखल असल्याने शाहुपूरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक आर. एस. सावंत्रे यांनी या टोळीविरुध्द संपुर्ण सातारा जिल्ह्यातुन दोन वर्षे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केलेला होता. या प्रस्तावाची चौकशी सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी केली होती. या टोळीने सातारा एस.टी. स्टँड परिसरात हुल्लडबाजी करत असताना सातारा एस टी स्टँड चौकीचे पोलीस अंमलदार हे त्यांना समजावुन सांगण्यासाठी गेले असता, टोळीतील इसमांनी पोलीस अंमलदार यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, दमदाटी करुन जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हद्दपार टोळीतील इसमांवर दाखल गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांच्या गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. या टोळीमधील इसम हे सातारा शहर तसेच परिसरामध्ये टोळीने सातत्याने गुन्हे करीत होते. त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्यामुळे सातारा तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता. अशा टोळीवर सर्वसामान्य जनतेमधुन कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या समोर टोळी प्रमुख अभिषेक ऊर्फ सोमनाथ गणेश आवारे, वय 22 वर्षे, रा. कपीला दुध डेअरी समोर कोंडवे, ता. जि. सातारा, टोळी सदस्य - ओेंकार संदिप थोरात, वय 20 वर्षे, रा. आझाद बेकरीच्या पाठीमागे मोळाचा ओढा सातारा आणि टोळी सदस्य - रोहन विलास थोरात,वय 21 वर्षे,रा.मतकर कॉलनी झोपडपट्टी सातारा, ता.जि.सातारा यांची सुनावणी होवुन त्यांनी या टोळीस संपुर्ण सातारा जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारित केला आहे. नोव्हेंबर 2022 पासुन मपोकाक 55 प्रमाणे 36 उपद्रवी टोळ्यांमधील 115 इसमांना, मपोकाक 56 प्रमाणे 38 इसमांना, मपोकाक 57 प्रमाणे 04 इसमांना अशा एकूण 157 जणांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असून सातारा जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या विरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत.

 या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पो.हवा. सचिन माने, पो.कॉं. सप्निल सावंत, पो.कॉं. सप्निल पवार यांनी योग्य पुरावा सादर केला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त