'ड्राय डे' दिवशी पोलिसांनी खाकीचीच लक्तरे वेशीवर टांगली

अवैध धंदेवाल्यांशी शाहूपुरी पोलिसांचे साटेलोटे; शाहूपुरी हद्दीत अवैध दारुचा महापूर; मिलीभगत पोलिसांच्या हाती फक्त दोनच बॉक्स

सातारा : साताऱ्यात अवैध धंदेवाल्यानी खुले बस्तान मांडले असून यास पोलीस दलाकडूनच पाठबळ मिळत असल्याने सातारा जिल्ह्यात अवैध धंदे वाढीस पोलीसच कारणीभूत असल्याचे पुन्हा एकदा समोर येत आहे. 

 आज (गुरुवारी) शहिद दिवस असल्याने शासनाने 'ड्राय डे' जाहीर केला होता. परंतु सातारा शहरात मात्र शाहूपुरी पोलिसांच्या कृपाशीर्वादाने ड्राय डे दिवशीच राधिका रोडवर अक्षरशः अवैध दारूचा महापूर वाहिला. अवैध दारू विक्री व दारू साठाबाबत सुज्ञ सातारकरांनी याची खबर प्रथम स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिली. तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेची टीम बाहेर असल्याचे सांगत व सदर प्रकरण शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी या घटनेत कारवाई करण्याच्या सूचना शाहूपुरी पोलीस ठाण्याचा नुकताच कारभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना दिल्या. नुकतेच कर्तव्यावर रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी आपल्या ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. परंतु एकवेळ खाकी घालताना घेतलेली शपथ विसरतील परंतु खाल्लेल्या हप्त्याला जागणार नाहीत ते शाहूपुरी पोलीस कसले ?. कारवाईसाठी शाहूपुरी ठाण्याचे ते ईमानी कर्मचारी घटनास्थळी पोहचले ते दारू धंदेवाल्याला घेऊनच. विशेष म्हणजे आपण कारवाईसाठी आलो असल्याचे भान न ठेवता अवैध धंदेवाल्याशी गप्पागोष्टी करत त्याला पुरावा नष्ट करण्याच्या सूचना देत (फोरव्हीलर गाडीत असलेला दारु साठा त्या गाडीसह कर्मचाऱ्यांदेखत दुसरीकडे हलविण्यात आला) व सुज्ञ सातारकरांनी दिलेली माहिती दाखवत अखेर कारवाईला सुरुवात केली. जिथे अवैध दारुचा साठा होता तिथे डोंगर पोखरून उंदीर शोधून काढत फक्त २ बॉक्स हातात घेऊन बाहेर पडले. मात्र अजून पर्यंत पोलीस ठाण्यात याबाबत कोणतीही नोंद झाली नाही. (कारण खाल्ल्या मिठालाही जगायचं होत आणि वरिष्ठांचा आदेश नाईलाजाने पाळायचा होता)

 त्यामुळे 'ड्राय डे' दिवशी शाहूपुरी ठाण्याच्या त्या दोन कर्मचाऱ्यांनी भरदिवसा खाकीचीच लक्तरे वेशीवर टांगली. भक्कम पुरावे सातारकरांनी देऊन देखील पोलिसांनी दाखवलेला कुचकामीपणा पुन्हा एकदा अवैध धंदेवाल्यांशी शाहूपुरी पोलिसांचे साटेलोटे असल्याची साक्ष देत आहे. एखाद्या क्लिष्ट गुन्ह्यात माहिती देणाऱ्यास पोलीस अधीक्षक बक्षीस जाहीर करतात. मात्र अवैध धंद्यांची माहिती देणाऱ्यास मात्र अशा लाचखाऊ पोलिसांमुळे आश्चर्याने तोंडात बोट घालण्याची वेळ येत आहे. कारण अवैध दारुचा साठा आणि त्याची होत असलेली वाहतूक व विक्री याचे सबळ व्हिडीओ असून ही संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसून फक्त नाममात्र कारवाई होत आहे. 

याचमुळे साताऱ्यात अवैध धंदे राजरोसपणे चालू असून गुन्हेगारी देखील वाढीस लागली आहे. यास असे लाचखाऊ पोलीस देखील तितकेच जबाबदार आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त