समाजातील लोकांनी दातृत्वाची भावना ठेवायला हवी : दत्तात्रेय इंगवले

काटवली जिल्हा परिषद शाळेत जीवनज्योत सामाजिक संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप व माजी शिक्षकांचा सन्मान

सातारा : "मोबाईलपासून दूर राहा, आई-वडिलांचा सन्मान करा आणि शिक्षकांची आज्ञा पाळा या तीन गोष्टी निश्चितपणे विद्यार्थ्यांना समाजात उच्च पातळीवर नेल्याशिवाय राहणार नाहीत. समाजात पत सांभाळायची असेल, तर माणसाने दातृत्वची भावना ठेवावी. कोणतीही गोष्ट दान केल्याने संपत नाही, तर वाढतच असते. हे शिक्षकांच्या निरंतर मार्गदर्शनातून सिद्ध होत आले आहे. त्यामुळे समाजातील लोकांनी दातृत्वाची भावना ठेवायला हवी," असे आवाहन एलआयसीचे विकास अधिकारी दत्तात्रेय इंगवले यांनी केले. काटवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जीवनज्योत सामाजिक व शैक्षणिक संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व माजी शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. त्यावेळी इंगवले बोलत होते.

   दत्तात्रय इंगवले म्हणाले, "विद्यार्थ्यांचे कौतुक करत मोबाईलपासून लांब राहा. मोबाईल जसा चांगला तसा वाईटसुद्धा आहे. त्याचा योग्य वापर केला तर आपल्याला त्याचा फायदा होतो. मोबाईलमुळे माणसा माणसातील संवाद हरपला आहे. त्यामुळे मोबाईलपासून मुलं दूर राहिली तर निश्चितपणाने भविष्यात चांगली पिढी घडू शकेल. चांगली पिढी निर्माण झाली, तर हा शिक्षकी पेशाचा हा सन्मान आहे. शिक्षक हा स्वतःच्या घराच्या वारसा चालवू शकतो, तसा तो गावाचा, देशाचा वारसा चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो. देशाचे चांगले नागरिक घडवू शकतो. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान करेल तेवढ्या कमीच आहे. आज प्रामुख्याने साने गुरुजींची आठवण येते. साने गुरुजींनी ज्या पद्धतीने शिक्षण घेतले त्या पद्धतीने शिकवले, त्या पद्धतीने या विद्यार्थ्यांना शिकवले, तर ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत."

 कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक जगन्नाथ शिंदे (गुरुजी) होते. पी. जी. कांबळे, महामुनी, योगेश मालुसरे, दया सर ( कमांडो अकॅडमी), माजी शिक्षक शामराव रांजणे गुरुजी, अश्विनी बेलोशे, सरपंच मीनाक्षी बलोशे यांची भाषणे झाली. जीवनज्योत संस्थेचे अध्यक्ष मोहन बेलोशे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी श्री. विक्रम गोराडिया यांनी काटवली शाळेस अनेकदा शैक्षणिक मदत केली आहे, याचा आवर्जून मनोगतात उल्लेख केला. यावेळी संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिक, आठ गाव पंचक्रोशीतील सरपंच, सदस्य व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डिजिटल मीडिया पत्रकार संघटना महाराष्ट्राचे सातारा अध्यक्ष संतोष शिराळे, गणेश वायदंडे, कवी गुरुजी, अडसूळ गुरुजी, योगी मॅडम, मंगेश यादव, योगेश जंगम, संजय कदम, उमेश बेलोशे, रांजणी सरपंच मंदा रांजणे, वहागाव सरपंच संगीता शिराळे आदी मान्यवर उपस्थित होते. शिर्के सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार मुख्याध्यापिका कदम मॅडम यांनी आभार मानले. संस्थेचे उपाध्यक्ष महेश बेलोशे, पदाधिकारी किरण बेलोशे, वैभव पाटील, किशोर बेलोशे, सुनील कासुर्डे, योगेश राजपुरे, संतोष बेलोशे, गणेश जंगम, विकास बेलोशे, किसन बेलोशे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त