संजीवराजेंच्या घरी आयकर विभागाचे पथक; चौकशी चालू

सातारा : विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आज आयकर विभागाची चौकशी चालू आहे. संजीवराजे आणि रघुनाथराजे निंबाळकर यांचे निवास्थान असलेल्या जय व्हिला आणि सरोज व्हिला याठिकाणी आज सकाळी ६ वाजता आयकर विभागाची पथके दाखल झाली. सकाळपासून या ठिकाणी संजीवराजे यांची चौकशी या आयकर विभागाच्या पथकाकडून करण्यात येत आहे. 

रामराजे हे सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत विधानपरिषदेचे आमदार आहेत तर संजीवराजे आणि रघुनाथराजे यांनी आताच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटात प्रवेश केला होता. परंतु सध्या संजीवराजे हे पुन्हा अजितदादांच्या गटात प्रवरेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच आज आयकर विभागाने टाकलेल्या या छाप्याने सध्या जिल्ह्यात खळबळ माजली आहे. सध्या संजीवराजे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली असून याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त