संजय शेलार खून प्रकरणात एकूण ५ आरोपी ताब्यात

खुन, खुनाचा कट व आरोपीस आश्रय देणारे गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह एकुण ५ आरोपी गजाआड

सातारा : जावळी तालुक्यातील अंधारी येथे दिनांक २ जानेवारी रोजी संजय गणपत शेलार यांच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) कण्हेर धरणाशेजारी असणाऱ्या हॉटेल जलसागरचा मालक अरुण बाजीराव कापसे (वय ५५, रा. माळ्याचीवाडी, ता. सातारा) याला बुधवारी पुन्हा मिरजमधून ताब्यात घेतले. त्याला मेढा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यास अटक करुन न्यायालयात हजर केले असताना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आत्तापर्यंत संजय शेलार खूनप्रकरणात एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. 

 यामध्ये सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल सीडीआरचे तांत्रिक विश्लेषण करुन संजय शेलार याचा खुन करणारा आरोपी रामचंद्र तुकाराम दुबळे याला दिनांक १६/०१/२०२५ रोजी अटक केली. पोलीस कोठडीत असताना आरोपी याने सांगितले की, अरुण बाजीराव कापसे याचे सांगणेवरुन संजय शेलार याचा मी खुन केला आहे. संजय शेलार याचा खुन करण्यासाठी अरुण कापसे, रामचंद्र दुबले व विकास सावंत यांनी मिळुन खुनाचा कट रचला होता असे तपासात निष्पन्न झाले आहे. दिनांक १८/०१/२०२५ रोजी विकास अवधुत सावंत (वय ३५ वर्षे, व्यवसाय- बाऊन्सर, रा.आगलावेवाडी ता. जावली जि. सातारा) याला अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्याकडून वर्ग करण्यात आला असता त्यांनी तात्काळ चार पोलीस पथके नेमुन गुन्ह्यातील मुख्य आरोपी अरुण बाजीराव कापसे याचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेवुन त्यास मिरज येथून अटक करण्यात आली आहे. तसेच मुख्य सुत्रधार आरोपी अरुण बाजीराव कापसे यास पळुन जाणेसाठी मदत करणारा अजिंक्य गवळी व लपण्यासाठी आश्रय देणारा प्रशांत शिंत्रे यांनाही दिनांक २२/०१/२०२५ रोजी अटक करण्यात आली असुन सदर आरोपींना मेढा न्यायालयात हजर केले असता त्यांना २८ जानेवारीपर्यंत ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

  यामध्ये अरूण बाजीराव कापसे (वय ५६ वर्षे, रा. माळ्याचीवाडी ता. जि. सातारा), रामचंद्र तुकाराम दुबळे (वय ३७ वर्षे, रा. मतकर कॉलणी, शाहुपुरी ता. जि. सातारा), विकास अवधुत सावंत (वय ३५ वर्षे, रा. ११९३, कासाबिल्डींग, मोळाचा ओढा ता. जि. सातारा), अजिंक्य विजय गवळी (वय-३६वर्षे, रा. शनिवारपेठ नागोबा कट्टा मिरज, ता. मिरज, जि. सांगली), प्रशांत मधुकर शिंत्रे (वय - ३२ वर्षे, रा. मु.पो. बेळंकी, ता. मिरज जि. सांगली) यांना अटक करण्यात आली आहे.

   सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अरुण देवकर, पो.नि. जितेंद्र शहाणे, सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अमोल गवळी, पोउपनि पांगारे, पोउपनि शिंगाडे, पोउपनि सुधीर वाळुंज, तसेच स्था. गु.शा., मेढा व वाई पो.स्टे. कडील पोलीस अंमलदार यांनी कारवाई केली आहे. सदर कामगिरीबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती. वैशाली कडुकर यांनी सर्व अधिकारी अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक, सातारा हे करीत आहेत.


आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त