सातार्‍यात चिमुरडीवर अत्याचार : पोक्सो अंतर्गत शाहुपूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा : सातारा शहर परिसरात अवघ्या साडेपाच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी प्रवीण श्रीरंग मोरे (वय 30, रा. मोरेवाडी ता.सातारा) या नराधमावर शाहुपूरी पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना 19 जानेवारी रोजी घडली आहे. अल्पवयीन मुलगी खेळत असताना संशयित प्रवीण मोरे याने पाहिले. मुलगीजवळ कोणी नसल्याचे पाहून त्याने मुलीला टेरेसवर नेले. तेथे त्याने अत्याचार केला असता मुलगी रडू लागली. संबंधित घटनेची माहिती कोणाला देवू नको, असे म्हणत मुलीला धमकावले. या घटनेशिवाय इतरवेळीही मुलीचा विनयभंग केला. या सर्व घटनेने मुलगी घाबरुन गेली होती. मुलीच्या आईने मुलीला बोलते केल्यानंतर घडलेल्या घटनेची माहिती तिने दिली. यानंतर मुलीच्या आईने शाहूपुरी पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. पोलिसांनी त्यानुसार संशयिता विरुध्द पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त