अपघातातील जखमी वानरास मिळाले जीवदान.
प्रकाश शिंदे- Thu 2nd Feb 2023 12:19 pm
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : पुणे बंगलोर महामार्गावर शेंद्रे (ता. सातारा) गावच्या हद्दीत सातारा ते कराड जाणारे लेनवर चारचाकी वाहनाच्या धडकेत एक वानर गंभीर जखमी झाले. वनविभागाच्या रेस्क्यु टीमकडून तात्काळ वैद्यकीय मदत मिळाल्याने त्यास जीवदान मिळाले.

या घटनेबाबतची अधिक माहिती अशी,आज दि. १ रोजी शेंद्रे गावच्या हद्दीत गावाकडून डोंगराच्या दिशेने वानरांचा एक कळप चालला होता. महामार्ग ओलांडताना त्या कळपातील एका वानरास चारचाकी वाहनाची जोरदार धडक बसली. त्याच दरम्यान दै. प्रभातचे नागठाणे प्रतिनिधी विजय घोरपडे तिथुन प्रवास करत होते. त्यांच्या ध्यानात ही घटना येताच तिथे थांबुन त्यांनी वनविभागास तात्काळ संपर्क साधुन जखमी वानराची माहिती दिली. उप-वनसंरक्षक महादेव मोहिते, वनाधिकारी निवृत्ती चव्हाण ,वनसंरक्षक कुशल पावरा यांच्या मार्गदर्शना खाली वनरक्षक राजु मोसलगी यांनी तात्काळ वनविभागाची रेस्क्यु टीम घटनास्थळाकडे रवाना केली. रेस्क्यु टीमचे पशुवैद्यकीय डॉक्टर लोकेश रिटे यांच्यासह पवन शिरतोडे ,ओमकार ढाले हे अपघातस्थळी पोहचले व जखमी वानरास ताब्यात घेतले. वानरावर योग्य ते उपचार करून बरे झाल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याची माहिती उप-वनसंरक्षक महादेव मोहिते यांनी सांगितले. चारचाकी वाहनचालक मोहन जाधव यांनी ही मोलाचे सहकार्य केले.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Thu 2nd Feb 2023 12:19 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Thu 2nd Feb 2023 12:19 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Thu 2nd Feb 2023 12:19 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Thu 2nd Feb 2023 12:19 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Thu 2nd Feb 2023 12:19 pm
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Thu 2nd Feb 2023 12:19 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Thu 2nd Feb 2023 12:19 pm
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Thu 2nd Feb 2023 12:19 pm
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Thu 2nd Feb 2023 12:19 pm
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Thu 2nd Feb 2023 12:19 pm
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Thu 2nd Feb 2023 12:19 pm
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Thu 2nd Feb 2023 12:19 pm










