उदयनराजेंनी लावला शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
2019 च्या पराभवाचा काढला वचपाSatara News Team
- Tue 4th Jun 2024 03:43 pm
- बातमी शेयर करा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी 1999 पासून ओळख असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाला अखेर सुरुंग लागला आहे. साताऱ्यातून भाजपाकडून उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत झाली.उदयनराजे भोसले यापूर्वी तीन वेळा राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. पण, मागील पोटनिवडणुकीत त्यांचा श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता. यावेळी उदयनराजे यांनी पराभवाचा वचपा काढला आहे.विजयानंतर उदयनराजे भावूक झालेले पाहायला मिळाले. त्यांच्या डोळ्यात आनंदअश्रू पाहायला मिळाले.
सातारा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये सातारामध्ये भाजपाचे शिवेंद्रराजे भोसले आमदार आहेत. पाटणमध्ये शिवसेनेचे शंभुराज देसाई, कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, कराड उत्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बाळासाहेब पाटील, वाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील तर कोरेगावमधून शिवसेनेचे महेश शिंदे आमदार आहेत. सहापैकी चार जागा या महायुतीकडं असून दोन जागांवर महाविकास आघाडीचे आमदार होते.
ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील 87 हजार मतांनी विजयी झाले होते. या पराभवाचा वाचपा 2024 च्या निवडणुकीत काढण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले होते आणि त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलेला आहे
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Tue 4th Jun 2024 03:43 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Tue 4th Jun 2024 03:43 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Tue 4th Jun 2024 03:43 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Tue 4th Jun 2024 03:43 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Tue 4th Jun 2024 03:43 pm
संबंधित बातम्या
-
फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी प्रथमच मोठा भरीव 70 कोटींचा निधी.
- Tue 4th Jun 2024 03:43 pm
-
नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी उघड केला नगर परिषदेतील कर घोटाळा, अनेक वर्षापासून सुरू होता कर घोटाळा
- Tue 4th Jun 2024 03:43 pm
-
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Tue 4th Jun 2024 03:43 pm
-
कसं काय पाटील बर हाय का विधानसभेत जे ऐकले ते खर आहे का? ॲड. संदीप कांबळे.
- Tue 4th Jun 2024 03:43 pm












