सपोनि. अक्षय सोनवणे यांचा कारवाईचा धडका सुरूच.

वाहतुकीस अडथळा आणल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल.

 मलवडी: दहिवडी पोलिसांनी आज बेशिस्त व बेजबाबदार पणे वाहन चालवणाऱ्या चालकावर धडक पणे कारवाई करत वाहतुकीस अडथळा आणल्या प्रकरणी गोंदवले मध्ये चार जणांवर गुन्हे दाखल केले. तसेच दहिवडी मध्ये दोन दिवसापूर्वी रहदारीस अडथळा आणल्या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. 
     
गोंदवले मंदिर परिसरातील रस्त्यावर नेहमीच रहदारीच्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा होईल अशा  वाहनांची गर्दी होत असते. तर अनेक वेळा वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीची वाहने मंदिर परिसरात उभी केली जात असतात. आज अशा वाहन चालकावर पोलिसांनी कारवाई केली. 
   सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर रहदारीच्या वाहतुकीस अडथळा होईल, अशा पद्धतीची वाहने उभी केल्याबद्दल गोंदवले येथे टू व्हीलर चालक अजय वसंत अवघडे ( रा. वाघमोडेवाडी) अभय रावसाहेब परकंदे( रा.गोंदवले बुद्रुक) यांचे विरुद्ध पोलीस यशोदा मोरे व कॉन्स्टेबल प्रकाश इंदलकर यांनी फिर्याद दिली असून त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास एन. एल. कोळेकर,आर. व्ही. बनसोडे करत आहेत. 
   बेशिस्तपणे बेजबाबदारपणे वाहन पार्किंग हा कधी कधी त्या चालकाचा दोष नसून गोंदवले मंदिर परिसरात  वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात यावी. वाढत्या अतिक्रमणामुळे तसेच रहदारीच्या रस्त्यावर लोकांना आपली वाहने रस्त्याच्या कडेला पार्किंग करावी लागत आहेत. त्यामुळे वाहतुकीस, अडथळा निर्माण होत आहे. दहिवडी शहर व गोंदवले मंदिर परिसरात , वाहतुकीस होत असलेला अडथळा दूर करायचा असेल तर त्या ठिकाणी असलेले अतिक्रमण काढले गेले तर वाहतूक सुरळीत होईल. तशी मागणी लोकांतून होत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला