समाजमाध्यमांवर बोरगाव पोलिसांचे लक्ष : रवींद्र तेलतुंबडे

सातारा : सद्यस्थितीत सुरू असलेल्या जातीयवादी घडामोडींच्या संदर्भाने सामाजिक प्रसार माध्यमांवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. बोरगाव पोलीस ठाण्याकडूनही अशा प्रकारच्या सर्व माध्यमांवर लक्ष ठेवले जात असून, कार्यक्षेत्रातील नागरिकांनीही या कामी सहकार्य करावे, असे आवाहन बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी केले आहे.
  रवींद्र तेलतुंबडे यांनी पुढे म्हटले आहे की, कोणीही कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारे तसेच भडकावू किंवा शांतता भंग करणे, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह संदेश, छायाचित्रे, छायाचित्रीकरण यांची शहनिशा न करता सामाजिक प्रसार माध्यमावर ती माहिती प्रसारित करू नये. बोरगाव पोलीस दलामार्फत फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हाट्सअप इत्यादी सामाजिक प्रसार माध्यमावर देखरेख करण्यात येत असून त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला