पुसेसावळी येथील शहिद जवान प्रमोद कदम यांचेवर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जवान प्रमोद कदम यांच्या शहिद झाल्याची माहिती मिळताच पुसेसावळी सह परिसरात शोककळा पसरली

पुसेसावळी : शहिद जवान प्रमोद जगन्नाथ कदम यांनी २००३ मध्ये देशसेवेसाठी कार्यरत झाले होते. सेना सेवा कोअर ५१४ बटालियन देहरादून येथील सेनेचे ते हवालदार पदावर कार्यरत होते २०२६ मध्ये सेवानिवृत्ती होणार होती. परंतू शुक्रवार दिनांक ०३ जानेवारी २०२५ रोजी जम्मू काश्मीर येथे ते शहिद झाल्याची माहिती मिळताच पुसेसावळी सह परिसरात शोककळा पसरली आहे . त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पुसेसावळी येथील मुख्य चौकातून काढण्यात येणार असून संपूर्ण शहरातून अंत्ययात्रा गोरेगाव रस्त्यावर असलेल्या महात्मा गांधी विद्यालयात समोर असलेल्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती माजी ग्रामपंचायत सदस्य आणि जिवलग मित्र सचिन कदम यांनी दिली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त