डॉ. शिवाजीराव कदम यांना इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार जाहीर
- Satara News Team
- Thu 2nd Jan 2025 11:40 am
- बातमी शेयर करा
सातारा : रयत शिक्षण संस्थेचे माजी मानद सचिव पै. इस्माईलसाहेब मुल्ला यांची ५१ वी पुण्यतिथी कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या वतीने शनिवार दि.४ जानेवारी रोजी दु. ४.३० वा. सातारच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केला आहे. यावेळी
महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस दिला जाणारा पै. इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार यावर्षी भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम यांना जाहीर झाला असून तो उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याचे संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी सांगितले.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार आणि
एक लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह हे डॉ.शिवाजीराव कदम यांना देण्यात येणार आहे. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, कायदा सल्लागार ॲड.दिलावरसाहेब मुल्ला, मुल्ला कुटुंबीय, रयत परिवार उपस्थित राहणार आहेत. शिक्षण प्रेमींनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले आहे.
कर्तृत्ववान व्यक्तीचा सन्मान भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती मा. डॉ. शिवाजीराव कदम यांची शिक्षण तज्ज्ञ,संशोधक, कुशल प्रशासक, रसायनशास्त्रात डॉक्टरेट, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात १७५ हुन अधिक शोधनिबंध सादर केले आहेत. देशातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या भारती विद्यापीठाचे ते कुलपती असून पदी त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा नोंदविला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य, आधिसभा सदस्य असून उच्च शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल राष्ट्रपती आणि सरन्यायाधीशांच्या हस्ते ‘राष्ट्रीय कायदा दिन पुरस्कार’ सह अनेक पुरस्कारांना त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
satara
sataranews
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील शहिद जवान प्रमोद कदम यांचेवर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
- Thu 2nd Jan 2025 11:40 am
शहरातील डी-मार्ट नजीक खाणीत सडलेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह फलटण येथील तांबोळी यांचा
- Thu 2nd Jan 2025 11:40 am
श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आजपासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ
- Thu 2nd Jan 2025 11:40 am
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीसाहेब 'मॅप्रोवर कारवाई झालीच नाही ओ'?
- Thu 2nd Jan 2025 11:40 am
हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच पेशंटचा मृत्यू झाला असल्याचा डॉ. भूषण पाटील यांचा दावा
- Thu 2nd Jan 2025 11:40 am
सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील
- Thu 2nd Jan 2025 11:40 am
संबंधित बातम्या
-
शिक्षकाची बदली रद्द करा अन्यथा आमच्या मुलांचे दाखले परत द्या
- Thu 2nd Jan 2025 11:40 am
-
श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आजपासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ
- Thu 2nd Jan 2025 11:40 am
-
डी. जी. कॉलेजमध्ये मध्ये स्टेट बँक भरतीचे मार्गदर्शन
- Thu 2nd Jan 2025 11:40 am
-
सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी
- Thu 2nd Jan 2025 11:40 am
-
सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडीं
- Thu 2nd Jan 2025 11:40 am
-
आंधळीत उद्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या वर्धापन दिनाचे आयोजन
- Thu 2nd Jan 2025 11:40 am
-
रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्यवरांची उपस्थिती
- Thu 2nd Jan 2025 11:40 am
-
शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
- Thu 2nd Jan 2025 11:40 am