शिक्षकाची बदली रद्द करा अन्यथा आमच्या मुलांचे दाखले परत द्या

शेणोलीतील विद्यार्थी पालकांचे शाळा बंद आंदोलन सुरूच..

कराड..:     कराड तालुक्यातील शेणोली येथील संजीवनी शिक्षण संस्थेची मुख्य व सुरुवातीची शाखा संजीवनी विद्यामंदिर शेणोली मधील शिक्षक विजय लोहार सर यांची संस्थेने तडकाफडकी बदली केल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून गेल्या चार दिवसापासून शाळा बंद आंदोलन विद्यार्थी व पालकांनी सुरू केले आहे. संस्थेचे अध्यक्ष आणि पालक ग्रामस्थ यांची बैठक झाली परंतु या बैठकीमध्ये तोडगा न निघाल्याने हे आंदोलन चालूच ठेवले असून सोमवार दि. 6 जानेवारी 2025 पर्यंत शिक्षकाची बदली रद्द करा अन्यथा पाचवी ते दहावीतील 110 विद्यार्थ्यांचे दाखले काढून घेण्यात येणार असल्याचा इशारा पालकांनी व ग्रामस्थांनी दिलेला आहे. 


 शेणोली येथील संजीवनी विद्यामंदिर मधील शिक्षकांच्या कार्यक्षमतेमुळे आणि संस्था व्यवस्थापकांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली आहे.पालक व ग्रामस्थांनी या शाळा व्यवस्थापन कडे अनेक वेळा तक्रारी करून चांगले शिक्षक मिळावेत यासाठी प्रयत्न केले मागील दीड वर्षांपूर्वी असाच प्रयत्न करून चांगले शिक्षक शाळेमध्ये आणण्याचा प्रयत्न झाला. शिक्षक ही चांगले मिळाले.शाळेचे कामकाज व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला आणि शाळा व्यवस्थित चालली असताना संस्थेने अचानक लोहार यांची दि. 1 जानेवारी रोजी बदली केल्याने विद्यार्थ्यांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला असून याबाबत विद्यार्थ्यांनी पालकांना माहिती दिल्याने पालक व ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेऊन शाळा व्यवस्थापकांना याचा जाब विचारला परंतु कोणते उत्तर दिले नाही. यावरती तोडगा काढावा म्हणून पालक व ग्रामस्थांची दोन वेळा बैठक आयोजित करण्यात आली. दोन्ही बैठकांमध्ये संस्थाचालकांनी बदली रद्द करता येणार नसल्याची भूमिका घेतल्याने पालकांनी आमच्या विद्यार्थ्यांचे दाखले परत द्या या मागणी वरती जोर धरून आंदोलन करण्यात आले. 

 याबाबत संस्थाचालकाने कोणतीही सकारात्मक भूमिका न घेतल्याने शाळेमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोहार सरांची बदली रद्द होणार का..?, शाळा आमची नियमितपणे चालू होणार का? आणि गावातील शाळा कायमची बंद होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांच्या मध्ये चिंता आणि संताप व्यक्त केला जात आहे. संजीवनी शिक्षण संस्थेच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी आल्याचे बोलले जात आहे. जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी या बाबीकडे गंभीरपणे लक्ष देऊन या शाळेतील होणारा अनागोंदी कारभार थांबवावा अशी मागणी ही काही ग्रामस्थांनी केलेली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त