डी. जी. कॉलेजमध्ये मध्ये स्टेट बँक भरतीचे मार्गदर्शन

सातारा : धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे स्टेट बँक, आय. बी. पी. एस व इतर बँकिंग आणि वित्तीय संस्थामधील नोकर भरतीच्या पूर्वतयारीसाठी दररोज सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केलेले आहे. देशातील राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, सहकारी बँका तसेच विविध प्रकारच्या इतर वित्तीय संस्थांमधील प्रोबेशनरी ऑफिसर, क्लर्क, असिस्टंट मॅनेजर, अशोसिएट, एल.आय. सी. ऑफिसर इत्यादी पदाच्या नोकर भरतीसाठी इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनेल सिलेक्शन म्हणजेच आयबीपीएस द्वारे नोकर भरतीच्या परीक्षा घेतल्या जातात. सद्यास्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे १३७३५ ज्युनिअर असोशिएट (क्लार्क) व ६०० प्रोबेशनरी ऑफिसर्स भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार आता राज्यातील सर्व नागरी सहकारी बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील सर्व प्रकारची नोकर भरती, शासनाच्या विविध नोकर भरती देखील आयबीपीएस च्या धर्तीवर होणार आहेत. त्यामुळे बँकिंग, वित्तीय व शासकीय नोकर भरतीच्या या सर्व परीक्षांची योग्य तयारी करून घेण्यासाठी या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर प्रशिक्षण वर्गात गणितीय व सांख्यिकीय अभियोग्यता, बुद्दीमापन, तार्किक योग्यता, इंग्रजी भाषा व बँकिंगची तयारी करून घेतली जाणार आहे. याकरिता तज्ञ व अनुभवी मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात आलेली असून या मार्गदर्शन वर्गास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वातानुकूलित क्लासरूम, वातानुकूलित अभ्यासिका व संगणक कक्ष उपलब्ध करून दिला जाणार आहे. सदर प्रशिक्षण वर्गामध्ये कोणत्याही शाखेतील पदवीच्या प्रथम वर्ष,द्वितीय वर्ष आणि अंतिम वर्षाला असणारे तसेच पदवी पूर्ण झालेले युवक-युवती देखील प्रवेश घेऊ शकतात. हा मार्गदर्शन वर्ग सर्वांसाठी खुला असून इतर महाविद्यालयातील विद्यार्थीदेखील प्रवेश घेऊ शकणार आहेत. प्रवेश घेण्या-या विद्यार्थ्यांना दररोज तज्ञाद्वारे मार्गदर्शन, ग्रंथालय, संगणक लॅब अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध आहे. सदर मार्गदर्शन वर्गास प्रवेश घेऊन संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. गणेश जाधव व बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वय डॉ. विजय कुंभार यांनी केले आहे. प्रवेशा करिता महाविद्यालयाच्या https://enrollonline.co.in/Registration/Apply/DGCCS या वेबसाईटवरील ऑनलाईन अर्ज भरून १० जानेवारी २०२५ अखेर आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी ९६८९३७१८८९ किंवा ८८८८७८०५५४ वर संपर्क साधावा.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त