पुसेसावळी येथे पतसंस्थेच्या नावाखाली खाजगी सावकारीचा धंदा सुरू

दरमहा ७ टक्के तर वार्षिक तब्बल ८४ टक्के नुसार वसुली?

पुसेसावळी : सर्वसामान्य हातांवर पोट असणाऱ्या लोकांना लुबाडत नाही तो आळशी असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. बेरोजगारी वाढल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातपाय मारणाऱ्यांची संख्या लक्षणीय होत चालली आहे. तर यांच्या परिस्थीती चा अचुक नियोजन करून फायदा खासगी सावकारांनी आजपर्यंत घेतला होता आणि सध्या ही घेत आहेतच. यांचे बळी पडणाऱ्या काहींनी घरदारं सोडून दिले तर काहींना तगादा सहन न झाल्याने जगणंही सोडून दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. परंतू आता सावकारीचे आधुनिकीकरण करत @@@@ अर्बन को-ऑप सहकारी संस्थांचे नोंदणीकृत पांघरूण घेत महिन्याला ०७% पर्यंत व्याज आकारणी म्हणजे दरसाल दर शेकडा ८४% व्याज आकारणी करण्याचे प्रकार सुरू आहेत. शिवाय १४ महिन्यात संस्थेने वाटप केलेली कर्जाची रक्कम १०२% मात्र व्याजाने मिळवली जाते तरीदेखील मुद्दल जशीच्या तशीच ग्राहकांच्या कडे येणे बाकी राहते. 

 पुसेसावळी येथे गेल्या वर्षभरात अशीच एक कर्जवाटप करणारी संस्था अस्तित्वात आली आहे.वडूज येथील सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात डिसेंबर २०२३ च्या कालावधीत नोंदणीकृत असलेली "@@@@ अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., पुसेसावळी, ता.खटाव, जि. सातारा हि उपनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १९(१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम, १९६१ मधील नियम क्र.१०(१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण "साधन संपत्ती संस्था" असून उपवर्गीकरण "कर्ज देणाऱ्या साधन संपत्ती संस्था" आहे. तर नोंदणी करतेवेळी महाराष्ट्र शासनास दिलेल्या आदर्श उपविधी मध्ये नमूद संस्थेकडून ग्राहकांना वाटप करण्यात आलेल्या कर्जावरील व्याजदर बाबत नियमांची माहिती अधिकार अर्जातून मिळालेली माहिती आणि प्रत्यक्षात होत असलेली कर्जाची टक्केवारी यामध्ये 'जमीन आसमान' चा नव्हे तर 'पाताळ आणि आकाशगंगेचा' फरक दिसून येतो.

 पुसेसावळी येथील नवीन एसटी स्टँड जवळ कार्यरत असलेल्या या "@@@@ अर्बन को-ऑप. सोसायटीच्या माध्यमातून उदरनिर्वाहासाठी नवीन लघुउद्योग अथवा काही निकडीच्या गरजा भागविण्यासाठी गरिब, बेरोजगार तरुणांना कर्ज वाटप करताना दुचाकी, चारचाकी वाहणांचे ओरिजनल रजिस्ट्रेशन कार्ड, हस्तांतरण फॉर्म वर वाहन मालकाच्या सह्या, आधार कार्ड झेरॉक्स, पॅनकार्ड झेरॉक्स, १०० रुपयांचे तीन स्टॅम्प, दोन जामीनदार, त्यांचे आधार कार्ड झेरॉक्स, पॅनकार्ड झेरॉक्स आणि कर्ज मागणी अर्जासह इतर काही फॉर्म वर मोठ्या प्रमाणावर सह्या घेतल्या जातात. त्यानंतर सदरचे वाहन हे कर्जाची रक्कम स्विकारणाऱ्या मालकाच्या ताब्यातच ठेवून वाहनाच्या किमती नुसार ३० हजारांपासून पुढे संबंधिताच्या खात्यात अथवा चेक स्वरूपात देण्यात येते. हि प्रक्रिया रितसर असली तरी खरी फसवणूक सुरू होते पहिल्या हप्त्या पासून महिन्याला ७ टक्के म्हणजे वार्षिक दरसाल दर शेकडा ८४ टक्के व्याजदराने वसुली केली जाते. शिवाय या ७ टक्के व्याजदराने कर्जफेड करणाऱ्या ग्राहकांची मुद्दल जशीच्या तशीच राहत असून मात्र १४ महिन्यांमध्ये वाटप केलेल्या रकमेच्या १०२ टक्के रक्कम वसुल करण्यात येते परंतू मुद्दल मात्र कमी होत नाही. 

 शिवाय संपुर्ण कर्जाची परतफेड करायचे असेल तर ग्राहकांना घेतलेल्या कर्जाची एकरकमी रक्कम भरावी लागत असल्याने पुसेसावळी सह परिसरातील ग्राहकांची होत असलेली फसवणूक लक्षात आल्यावर काहींनी सातारा न्यूज शी संपर्क साधत होत असलेल्या अन्यायास वाचा फोडण्याची विनंती केली आहे. तर अनेक ग्राहक या सावकारी पाशातून मुक्त होण्यासाठी आत्महत्या सारख्या अती टोकाच्या भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने या पतसंस्थेच्या नावाखाली सावकारी चा व्यवसाय करणाऱ्यांवर गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करावी. अशी चर्चा पिळवणूक झालेल्या आणि होत असलेल्या ग्राहकांमध्ये सुरू आहे. संबंधित पतसंस्थेच्या चालकांनी वेळीच सावध होऊन ग्राहकांना या सावकारी पाशातून मुक्त न केल्यास पिडित ग्राहक वेळप्रसंगी पुराव्यानिशी फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याच्या मानसिकतेत असल्याचे सुरू असलेल्या चर्चेतून दिसून येत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त