साताऱ्यात रिअल इस्टेट एजंटचा खून करून मृतदेह पूरला 2 महिन्यानंतर उघडकीस
- Satara News Team
- Thu 26th Oct 2023 06:22 pm
- बातमी शेयर करा
सातारा : जमीन खरेदी विक्री करणाऱ्या एका एजंटचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी माहिती घेवून काही जणांची धरपकड केली. तसेच सातारा शहर पोलिस ठाण्यात चाैघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून हे कृत्य झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी शहर ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे यांनी तक्रार दिलेली आहे. या तक्रारीनुसार शिवाजी नामदेव शिंदे (रा. सैदापूर, सातारा), अक्षण चव्हाण (पूर्ण नाव नाही, कोंडवे, ता. सातारा), विशाल उर्फ भैय्या खवळे (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सतारा) आणि सुमीत भोसले (पूर्ण नाव नाही, रा. पाडेगाव, ता. खंडाळा) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
संशयित शिवाजी शिंदे याचे संदीप संकपाळ यांच्याबरोबर जमीन विक्री कमीशनवरुन वाद झाला होता. यातून चिडून संदीप संकपाळ यांना २१ आॅगस्ट २०२३ रोजी साताऱ्यातील पोवई नाक्यावरुन संशयितांनी नेले. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी दोनच्या सुमारास संकपाळ यांचा गळा आवळून खून करण्यात आला. तर पुरावा नष्ट करण्यासाठी संदीप संकपाळ यांचा मृतदेह पाडेगाव, ता. खंडाळा गावच्या हद्दीत सर्दचा ओढाजवळ वघळीत पुरून पुरावा नष्ट करण्याच प्रयत्न करण्यात आला. याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात चाैघांवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस अधिक माहिती घेत आहेत.
साताऱ्यात ऑगस्टपासून एकजण होता बेपत्ता…
साताऱ्यातील जमीन खरेदी विक्री करणारा एजंट ऑगस्ट महिन्यापासून बेपत्ता होता. याप्रकरणी बेपत्ता एजंटच्या कुटुंबियांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा तपास सुरु केला. सुरुवातीला त्याबाबत काही माहिती मिळाली नाही. बुधवारी मात्र या घटनेत नाट्यमय घटना घडत गेल्या. व्यक्तीचा खून झाल्याचे समोर आले. याप्रकरणी काही संशयितांची धरपकड करण्यात आली.
खून केल्यानंतर मृतदेह पुरला निर्जनस्थळी…
संशयितांनी साताऱ्यात खून केल्यानंतर तो मृतदेह लोणंद परिसरात निर्जनस्थळी पुरल्याचे सांगितले. पोलिस तपासात प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर तेही हादरुन गेले. संशयितांनी दिलेल्या माहितीनंतर त्याबाबत खातरजमा करण्यात आली असता पोलिसांना मानवी सांगाडा मिळाला आहे. त्यासाठी तज्ञ बोलावून घटनास्थळ सील करण्यात आले.
खुनाचे नेमके कारण काय?
पोलिसांनी संशयितांकडे प्राथमिक चौकशीला सुरुवात केली असून खुनाचे नेमके कारण काय? खून कशाने केला? खून कुठे केला? खुनामध्ये नेमका किती जणांचा सहभाग आहे? खुनाचा उद्देश काय? असे प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
स्थानिक बातम्या
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून घरी परतत असतानाच ग्राम महसूल अधिकारी रोहित कदम यांचा अपघाती मृत्यू
- Thu 26th Oct 2023 06:22 pm
शेताजवळचा कचरा उचलाय सांगून सुद्धा उचलला नाही म्हणून ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर दिला पेटवून
- Thu 26th Oct 2023 06:22 pm
जिल्ह्यात बारा वाजेपर्यंत मतदान संत गतीनेच
- Thu 26th Oct 2023 06:22 pm
शरद पवारांनी त्या काळात काँग्रेस फोडली ती गद्दारी नव्हती का ? ...उदयनराजे
- Thu 26th Oct 2023 06:22 pm
255 फलटण विधानसभा मतदारसंघात शासकीय यंत्रणा सुसज्ज
- Thu 26th Oct 2023 06:22 pm
पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरूणास अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
- Thu 26th Oct 2023 06:22 pm
संबंधित बातम्या
-
शेताजवळचा कचरा उचलाय सांगून सुद्धा उचलला नाही म्हणून ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर दिला पेटवून
- Thu 26th Oct 2023 06:22 pm
-
पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरूणास अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
- Thu 26th Oct 2023 06:22 pm
-
बोरगाव पोलीसांकडून 2 सराईत गुन्हेगार सातारा जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार
- Thu 26th Oct 2023 06:22 pm
-
गोंदवले बु.!! येथील खून प्रकरणातील फरार सर्व आरोपींना अटक....
- Thu 26th Oct 2023 06:22 pm
-
गोंदवले बु!! येथे शेतात ट्रॅक्टर घेऊन जायचे नाही म्हणत लाकडी काठीने मारहाण,
- Thu 26th Oct 2023 06:22 pm
-
जावई अन् सासऱ्यानेच चोरले ओगलेवाडीतील 110 तोळे सोने
- Thu 26th Oct 2023 06:22 pm
-
लक्ष्मीपूजनासाठी घरी आणलेले ११० तोळ्यांचे दागिने चोरीस
- Thu 26th Oct 2023 06:22 pm
-
साताऱ्यातील शेंद्रेजवळील सोनगाव तर्फमध्ये 95 लाखांची रोकड जप्त
- Thu 26th Oct 2023 06:22 pm