कोल्हापूरला निघालेली खासगी बस वराडे येथे पलटी १२ प्रवासी जखमी

कऱ्हाड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वराडे, ता. कऱ्हाड येथे मोहिते वस्तीसमोर खासगी बस उलटली. या अपघातात खासगी बसमधील १२ प्रवासी जखमी झाले आहेत. बोरवलीवरून कोल्हापूरला ही ट्रॅव्हल्स निघाली होती. आज, बुधवारी सकाळच्या सुमारास वराडे गावच्या हद्दीत चालकाचे नियंत्रण सुटल्याने वळणावर ट्रॅव्हल्स पलटी झाली. 

बोरिवलीहून कोल्हापूरकडे निघालेली खासगी ट्रॅव्हल्स बुधवारी सकाळी वराडे गावच्या हद्दीत तासवडे टोलनाक्यापासून काही अंतरावर असलेल्या मोहिते वस्तीनजीक आली. त्यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने खासगी बस महामार्गनजीक पलटी झाली. या खासगी बसमधून सुमारे २८ जण प्रवास करत होते. यातील बारा प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उंब्रज येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  अपघातानंतर सुमारे पाऊण तास वाहतूक खोळंबा होवून सुमारे दोन किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागल्या. 

दरम्यान क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रॅव्हल रस्त्यातून बाजूला करण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. घटनास्थळी तळबीड पोलीस दाखल झाले असून त्यांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त