कोल्हापुरात ६ लाख रुपये किमतीचं बिबट्याचं कातडं जप्त

सातारा  न्यूज  कोल्हापूर ; वन्यजीव प्राण्याची हत्या करणं, त्यांच्या शरीराचे भाग विकणं हा कायद्यानं गुन्हा आहे. हे माहीत असतानादेखील बाजीराव यादव आणि ब्रह्मदेव पाटील हे दोन तरुण बिबट्याचं कातडं विक्रीसाठी दिंडनेर्ली इथं आले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं या दोघा संशयितांना दिंडनेर्ली फाट्याजवळ अटक केली. त्यांच्याकडून ६ लाख रुपये किमतीचं बिबट्याचं कातडं जप्त करण्यात आलंय.


वन्यजीव प्राण्यांची हत्या होत आहे. तसंच त्या प्राण्यांच्या शरीराचे अवशेष विकले जातात. याबाबत कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी प्रभारी पोलिस अधिकार्‍यांना आदेश दिले होते. गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी वन्यजीव प्राण्यांची कातडी आणि शरीराचे अवशेष विकणार्‍या टोळीच्या शोधात होते. दरम्यान, हवालदार संभाजी भोसले यांना त्यांच्या खबर्‍याकडून गोपनीय माहिती मिळाली. आज करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली इथं दोन व्यक्ती बिबट्याचं कातडं विकण्यासाठी येणार असल्याचं समजल्यानं वरिष्ठांच्या सूचनेनुसार परिसरात सापळा लावण्यात आला होता. कातडं विक्रीसाठी आलेल्या बाजीराव यादव आणि ब्रह्मदेव पाटील यांना पथकानं ताब्यात घेतलं. त्यांच्याकडील ६ लाख रुपये किमतीचं बिबट्याचं कातडं जप्त करण्यात आलं. दोघा संशयितांना इस्पुर्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला