चैन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार यांना ढेबेवाडी पोलीस यांनी केली अटक
सागर पाटील
- Sat 20th Jun 2026 08:01 pm
- बातमी शेयर करा
पाटण : दिनांक २२/०६/२०२५ रोजी दुपारी ०४.३० वा.चे सुमारास मौजे गलमेवाडी ता.पाटण जि.सातारा गावचे हददीत गलमेवाडी ते येवती दरम्यानच्या घाटात महिला नामे आक्काताई राजाराम चोरगे वय ६० वर्षे या गुरे चारुन घरी परत येत असताना एका काळया रंगाच्या मोटारसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळयातील सुमारे ७५,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे मनीमंगळसुत्र व डोर्ले असा किंमती ऐवज गळयातुन हिसकावुन, चोरुन घेवुन मोटारसायकलवरुन पळुन गेलेले होते सदर घडले घटनेबाबत ढेबेवाडी पोलीस ठाणेस गुन्हा रजि. नंबर ६३/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०४ (२), (५) प्रमाणे गुन्हा रजिस्टरी नोंद आहे.
सदरचा गुन्हा दाखल झालेवर तात्काळ सदर गुन्हयाचा तपास सुरू करुन गलमेवाडी ता. पाटण ते फलटण, जि. सातारा या दरम्यानचे सुमारे १५० कि.मी. मुख्य रस्त्यालगत असलेले सर्व महत्वाचे सी.सी.टी.व्ही. फुटेज पडताळणी करुन संशयीत फुटेज ताब्यात घेवुन फलटण ग्रामीण पोलीस तसेच बारामती पोलीस व गोपनिय बातमीदार यांच्या मार्फतीने आरोपींची पडताळणी करुन संशयीत आरोपी निष्पन्न केले व सातत्याने त्यांचे हालचालींवर लक्ष ठेवुन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असलेले आरोपी नामे साजन पवन भोसले रा. सोनगाव ता. फलटण जि.सातारा यास दिनांक १०/०६/२०२६ रोजी सापळा रचुन फलटण येथुन ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार चैतन्य शंकर लांडगे रा. सोनगाव बंगला ता. फलटण जि. सातारा याच्या मदतीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली, त्यानंतर आरोपी साजन भोसले यास गुन्हयाचे तपासकामी अटक करुन त्यास मा. न्यायालयाचे समोर हजर ठेवुन त्याची पोलीस कोठडी रिमांड मंजुर करुन त्याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने अधिक तपास करुन त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयातील दुसरा आरोपी चैतन्य शंकर लांडगे याच्या हालचाली पडताळुन गोपनिय बातमीदाराच्या मदतीने त्याचा ठावठिकाणी शोधुन पोलीस पथकाने दिनांक १८/०६/२०२६ रोजी सापळा रचुन आरोपी चैतन्य शंकर लांडगे यास सहयोगनगर, ता. हवेली जि. पुणे येथुन ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने चौकशी करुन दिनांक १९/०६/२०२६ रोजी अटक करुन त्यास मा. न्यायालयात हजर ठेवुन त्याची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करुन घेवुन आरोपी पोलीस कोठडीत असताना त्याचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेला एकुण ७५,०००/- रुपये किंमतीचा १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनीमंगळसुत्र व ड्रोले
असा किंमती मुददेमाल व आरोपींनी गुन्हयात वापरलेली बजाज २२० पल्सर मोटारसायकल हस्तगत करण्यात आलेली आहे.
सदर गुन्हयातील अज्ञात व फरार असलेल्या आरोपींचा तपास मा. श्री. निखील पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा, मा.वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे सुचनेप्रमाणे श्रीमती. राजश्री पाटील उपविभागीय पोलीस अधीकारी कराड चार्ज पाटण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ढेबेवाडी पोलीस ठाणे कडील सहा. पोलीस निरीक्षक प्रविण दाईंगडे, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित चव्हाण, पो. हवा. १४०९ नवनाथ कुंभार, पो.हवा.१७२७ प्रशांत चव्हाण, पो. हवा.५७९ छगन शेंडगे, पोकॉ. २६०२ प्रशांत माने, पोकॉ. १४९ माणिक पाटील, पो.कॉ. २६५९ सौरभ कांबळे, चालक पो.कॉ. २७६ विकास पाटील, चालक पो.कॉ.२५१४ माणिक थोरात यांनी केला असुन गुन्हयाचा पुढील तपास पो. हवा. १४०९ नवनाथ कुंभार हे करीत आहेत.
#crime#Patanpolice
स्थानिक बातम्या
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Sat 20th Jun 2026 08:01 pm
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Sat 20th Jun 2026 08:01 pm
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Sat 20th Jun 2026 08:01 pm
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Sat 20th Jun 2026 08:01 pm
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Sat 20th Jun 2026 08:01 pm
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Sat 20th Jun 2026 08:01 pm
संबंधित बातम्या
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Sat 20th Jun 2026 08:01 pm
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Sat 20th Jun 2026 08:01 pm
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Sat 20th Jun 2026 08:01 pm
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 20th Jun 2026 08:01 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Sat 20th Jun 2026 08:01 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Sat 20th Jun 2026 08:01 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Sat 20th Jun 2026 08:01 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Sat 20th Jun 2026 08:01 pm











