फलटण मधील दोघेजण दोन वर्षाकरिता जिल्ह्यातून तडीपार
राजेंद्र बोन्द्रे
- Tue 7th Jan 2025 04:46 pm
- बातमी शेयर करा

फलटण: फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणाऱ्या अभिजीत अरुण जाधव, वय २१ वर्षे, आकाश भाऊसो सावंत, वय २३ वर्षे, रा. दोन्ही रा. मलटण ता. फलटण, जि. सातारा यांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे
याबाबत पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी, दोघा सराईतांवर फलटण शहर पोलीस स्थानकात जबरी चोरी करणे, घरफोडी चोरी करणे, विनयभंग करणे असे गुन्हे दाखल असल्याने फलटण शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी हेमंतकुमार शहा यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपुर्ण सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्हयातील बारामती, पुरंदर तालुका, सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका हद्दीतून दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हहपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तायाची चौकशी राहुल आर धस, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग फलटण यांनी केली होती.
सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करून ही त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृतीत कोणताही बदल झाला नाही, या टोळीमधील इसन हे फलटण तसेच परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर कायदयाचा कोणताय धाक न राहील्यामुळे फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती. त्यानुसार पोलिसांनी दोघांना जिल्ह्यातून दोन वर्ष करिता तडीपार केले आहे
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो.हपा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, फलटण शहर पोलीस ताणेचे पो.हवा बापु धायगुडे, सचिन जगताप, पो.कॉ जितेंद्र टिके, यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.
स्थानिक बातम्या
शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- Tue 7th Jan 2025 04:46 pm
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार, दि. २८ जून २०२५
- Tue 7th Jan 2025 04:46 pm
सातारा न्यूज राशिभविष्य आज २७/६/२०२५ शुक्रवार
- Tue 7th Jan 2025 04:46 pm
'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेच्या सेटवर घडली मन हेलावून टाकणारी घटना
- Tue 7th Jan 2025 04:46 pm
सातारा न्यूज राशिभविष्य आज २६/६/२०२५ गुरुवार
- Tue 7th Jan 2025 04:46 pm
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Tue 7th Jan 2025 04:46 pm
संबंधित बातम्या
-
खूनप्रकरणातील विवाहितेच्या भावांवर गुन्हा दाखल
- Tue 7th Jan 2025 04:46 pm
-
अंजलीचा खुनाचा संशयित पती शुद्धीवर, विवाहितेच्या मृत्यूचे गूढ आज उलगडणार ?
- Tue 7th Jan 2025 04:46 pm
-
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खुन करुन मृतदेह कॉटच्या खाली झाकला कपड्याच्या गाठोड्यांनी
- Tue 7th Jan 2025 04:46 pm
-
अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्यास मारहान केलेल्या नराधमाच्या लोणंद पोलीसांनी आवळल्या मुसक्या
- Tue 7th Jan 2025 04:46 pm
-
माणमध्ये परमिट रूम मध्येही देशी दारूचा ‘सुळसुळाट’
- Tue 7th Jan 2025 04:46 pm
-
प्रेमप्रकरणातून अपहरण झालेल्याची सुटका
- Tue 7th Jan 2025 04:46 pm
-
एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कराडमधील दोन डॉक्टरांसह चौघांचे बनावट अश्लील व्हिडीओ धक्कादायक प्रकार
- Tue 7th Jan 2025 04:46 pm
-
मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Tue 7th Jan 2025 04:46 pm